गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांसह मविआ सरकारवर जहरी टीकास्त्र ! काय म्हणाले...

विजय पाटील
शुक्रवार, 4 जून 2021

मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण आणि पदोन्नती आरक्षणाचं महाविकास आघाडी सरकारला काही देणं घेणं नसल्याची टीका पडळकरांनी केली आहे.  

सांगली : शरद पवार Sharad Pawar यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार किती बहुजनद्वेष्टे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यांना मराठा आरक्षणाविषयी, Maratha Reservation ओबीसींच्या OBC राजकीय आरक्षणाविषयी आणि पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाही. Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar and Maha Vikas Aghadi government

पण न्यायालयाच्या निर्णया आधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. अशी टीका भाजपचे BJP आमदार MLC गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी केली आहे. 

मराठा आरक्षण मोर्चा; विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन वादाची शक्यता

सत्तेची वेसन बांधलेले काँग्रेसचे Congress लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवत आहेत. लवकरच माननीय सोनिया गांधींना Soniya Gandhi तुमचे मंत्री किती फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन सत्तेत काम करतात, याचे उद्बोधन करणार आहे. Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar and Maha Vikas Aghadi government

असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन आदेश मागे घेणे दूरच. उलट आरक्षण रद्दचा निर्णय अंमलात आणत राज्य सरकारने तब्बल 67 कक्ष अधिकाऱ्यांना अप्पर सचिवपदावर सेवाज्येष्ठते नुसार बढती दिली आहे.

हे देखील पहा -

पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा लागू करा आणि शासन आदेश मागे घ्या. या मागणीसाठी आधी आक्रमक आणि आता मवाळ झालेल्या काँग्रेसची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या फेटाळून लावली आहे. असेही ते म्हणाले. 

Edited  By : Krushnarav Sathe 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live