VIDEO | धनगर आरक्षण, सरकार आणि गोपीचंद पडळकरांचं अनोखं आंदोलन

साम टीव्ही
सोमवार, 14 डिसेंबर 2020

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लढणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पोलिसांनी मुस्कटदाबी केल्याचा निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड तालुका निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पडळकर यांची मुस्कटदाबी होत असल्याचा निषेध केला आहे. 

पाहा यासंदर्भातील पडळकरांच्या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ -

या पत्रकात सोलनकर यांनी नमूद केले आहे, विधान भवनात आज (ता. 14 डिसेंबर) आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपारिक वेशभूषेत येत धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षणासंदर्भातील 22 योजना भाजप सरकारच्या काळात धनगर समाजासाठी लागू केल्या होत्या, तसेच 1000 कोटी देण्याची तरतूदही केली होती. 

सोलनकर म्हणाले की, त्यानंतर भाजपचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारला सत्तेवर येऊन वर्ष लोटले, तरी या योजनांबाबत सरकारने चर्चाही केली नाही. हा धनगर समाजावर अन्याय आहे. हाच मुद्दा घेऊन पडळकर यांनी धनगर समाजाची वेशभूषा परिधान करून ढोल वाजवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील पोलिसांनी धनगर समाजाच्या मागण्यांचे बोर्ड तोडून टाकले व आंदोलन करण्यास मनाई केली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live