VIDEO| 'गोपीनाथ मुंडेंनीच रक्ताचं नातं तोडलं'

विकास माने, साम टीव्ही, बीड
शनिवार, 11 जानेवारी 2020

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. गोपीनाथ मुंडेंनीच नातं तोडण्याचा निर्णय जाहीर केला, त्यामुळे वेगळा मार्ग निवडायला लागल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे बालेकिल्ला परळीत दाखल झाले. त्यावेळी भावनिक होत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

धनंजय मुंडेंनी 2012 मध्ये काका गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. धनंजय मुंडेंनी काका गोपीनाथ मुंडेंना दगा दिला, काकांच्या पाठित खंजीर खुपसला अशी टीका त्यांच्यावर अनेकदा झाली पण पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी याविषयावर मौन सोडत आपल्यावरचे आरोप पुसण्याचा प्रयत्न केलाय.

WebTittle ::  'Gopinath Mundane breaks blood'

संबंधित बातम्या

Saam TV Live