खुशखबर ! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली: लागोपाठ सहा वर्षे हा बोनस मोदी सरकारच्या कार्यकाळात देण्यात आला आहे. यासारख्या निर्णयांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल आणि ते अधिक सक्षमतेने काम करतील, अशी भावना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती देताना व्यक्त केली.  देशातील ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या वर्षी ७८ दिवसांचे वेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बोनसपोटी अर्थसंकल्पात २,०२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडा प्राधिकरणातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद दसऱ्याआधीच मिळाला आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या बुधवारच्या बैठकीत म्हाडाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट २० हजार रुपये बोनस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा म्हाडातील सुमारे १७०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तर, यामुळे म्हाडाच्या तिजोरीवर ३ कोटी ४० लाख रुपयांचा भार पडणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुका संपल्यानंतर दिवाळी येत असल्याने म्हाडा प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत अधिकारी-कामगारांचा बोनस प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. ऐन दिवाळीत बोनसचा निर्णय जाहीर होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बुधवारच्या बैठकीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. गेल्या वर्षी म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांना १७ हजार रुपये, तर त्यापूर्वी २०१७ मध्ये १५ हजार रु. बोनस देण्यात आला होता. यंदा बोनसच्या रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार रुपयांची भर पडली आहे.

Web Title government approves productivity bonus to railway employees


संबंधित बातम्या

Saam TV Live