'सिमी' संघटनेवर पाच वर्षांची बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : देशातील दहशतवादी कारवायांमध्ये हात असलेल्या "स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) या संघटेनवर सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.

ही संघटना अद्यापही विघातक कारवाया करत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. 1967 च्या बेकायदा कृत्ये (प्रतिबंधक) कायद्याच्या उपकलम (1) आणि (3) तसेच कलम 3 नुसार ही संघटना बेकायदा असून, तिच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येत असल्याचे तीत म्हटले आहे.

2014 मध्ये बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेला स्फोट, 2014 मधील भोपाळमधील कारागृह फोडणे तसेच गयामध्ये 2017 मध्ये झालेल्या स्फोटांत "सिमी'चा हात असल्याचे आढळले आहे.

Web Title: Government Bans SIMI For Another Five Years As It Indulges in Subversive Activities

संबंधित बातम्या

Saam TV Live