महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनची होणार घोषणा? ...(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला होता. आणि कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सरकारने आता लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई: अखेर राज्यात लॉकडाऊन Lock Down करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  आज रात्री आठ नंतर राज्यात लॉकडाऊन लावला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray लॉकडाऊनची घोषणा करणार आहेत. राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत Cabinet Meeting घेण्यात आलेला होता. आणि कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सरकारने आता लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात रुग्णांची संख्या रोखणे आणि लसीकरण ही वेगात वाढवण्याचे लक्ष्य राज्यसरकार समोर उभे आहे. Government has decided to Complete lockdown in the Maharashtra state

याबाबत प्रतिक्रिया देत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope म्हणाले आहेत कि, "मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत आग्रही भूमिका घेतलेली आहे. कारण लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. ब्रेक द चैन मोहीम कागदावर सवलती देऊन पूर्ण होणार नाही.  त्यामुळे कठोर लॉकडाऊन करणे हा सर्वात महत्त्वाचा निर्णय राहील. आणि लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे. मुख्यमंत्री याबाबतची घोषणा करतील".  

"आतापर्यंत आपण अनेक कठोर निर्बंध राज्यात आणले. आणि निर्बंध लावल्यानंतर ही कोरोना Corona केसेस अपेक्षेप्रमाणे कमी झालेल्या नाहीत कमी होत नाहीत. ऑक्सिजनच्या तुटवडा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे हेही आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकांना काही ठिकाणी बेड भेटत नाही. म्हणून आज भरपूर चर्चा केल्यानंतर लवकरच काही तासांमध्ये महाराष्ट्रभर संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे". अशी माहिती अस्लम शेख Aslam Shaikh यांनी दिली आहे. Government has decided to Complete lockdown in the Maharashtra state.

"राज्यामध्ये Maharashtra कोरोनाचे आकडे वाढत आहेत. हे पाहिल्यानंतर फारच भयानक आणि भीषण परिस्थिती राज्यांमध्ये निर्माण झाली आहे असे दिसून येते. आणि ह्याच अनुषंगाने कॅबिनेट मधील सर्व मंत्र्यांची याबाबत बैठक घेतली आहे. आपल्याला जर चेन ब्रेक Break The Chain करायची असेल तर आपले वाढणारे कोविडचे आकडे खाली आणावे लागतील. यासाठी आपल्याला कठोर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. आणि आपले मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळातच तो निर्णय जाहीर करतील". अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live