शासकीय दुर्लक्ष अन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व्यथा !

veterinary
veterinary

अहमदनगर : २० मे १८९२ रोजी इंग्रजांनी महाराष्ट्रात पशुसंवर्धन खात्याची Animal Husbandry Department स्थापना केली. त्याकाळात घोडे, बैल यांच्यासह दुभत्या जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी या खात्याची स्थापना झाली. माणसांच्या आरोग्याप्रमाणे सर्व प्रकारच्या पशुधनाचे आरोग्य जपणे हा अन्नसुरक्षेच्या साखळीतला महत्वाचा भाग आहे. आजही महाराष्ट्रातल्या एकूण आर्थिक उत्पन्नातल्या ६५ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण हे पशु आणि त्यासंबंधित व्यवसायांमधील मिळकतीवर अवलंबून आहे. Government Neglect And Grievances Of Veterinary Officers!

 हे देखील पहा -

तर ३.५ ते ४ कोटी पशु आणि पक्षांचं आरोग्याची जबाबदारी ही राज्यातल्या फक्त अडीच हजार पशुवैद्यकांच्या Veterinary Officer खांद्यावर आहे. यासाठी ही मंडळी २४ तास आपल्या जीवाचं रान करत आहेत. पण या पशुवैद्यकांना कोरोना महामारीतही सरकारने Government वाऱ्यावर सोडले आहे. त्यांना ना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा भेटलाय, ना त्यांना लस भेटलीय ना त्यांना कुठल्या सुविधा भेटत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ३६ पशुवैद्यकांचा सेवा बजावताना कोरोनाने Corona अंत झाला आहे.  या पशुवैद्यकांचे ६० पेक्षा जास्त कुटुंबीय सुद्धा कोरोनाने  मरण पावले आहेत. 

अशातच एका पशुवैद्यकासोबत आज सकाळी घडलेली एक सुन्न करणारी घटना या दुर्लक्षित कोरोना योद्ध्याच्या शब्दातून. 

पशुवैद्यकीय अधिकारी संगमनेर, जि.अहमदनगर इथल्या डॉ.संतोष वाघचौरे यांचे हे आजचे स्वअनुभव आहेत. 

मित्रांनो,
माझ्या पत्नीचे ५५ पेशंट कॅपॅसिटी असलेल्या एका कोविड सेंटर ला २४ x ७ फार्मसी स्टोअर आहे. त्यामुळे कोविड महामारीच्या या कालखंडात विशेषतः दुसऱ्या लाटेत अनेक मृत पेशंटच्या बॉडी नेताना पाहीले आहे. माझ्या कुटुंबात भाऊ, बहीण, वहिनी, मेहुणे, त्यांची मुले, पत्नी आणि मी स्वतः असे आठ जण बाधित होऊन, हॉस्पिटल मधून सुखरूप बाहेर आलो. 

पण, काल आपल्या उपचार घेत असलेल्या एका पशुवैद्यक मित्राच्या मुलाचा सकाळीच फोन आला. काका लवकर या, पप्पांची तब्येत खूप खालावली आहे, त्यांना Intubate Karat आहेत. मला काही कळत नाही, सुचत नाही. तो स्वतः MBBS च्या दुसऱ्या वर्षाला असल्यानं त्याला परिस्थितीचं आकलन झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आंघोळ देखील नव्हती केली, मी नुकताच कोरोनातून बरा झालो होतो. त्यामुळं ९ वाजेपर्यंत हल्ली आवरतही नाही, पण तसाच पळालो. हॉस्पिटलमध्ये पोहचलो तर तो मुलगा आणि वहिनी दोघेही ढसाढसा रडत होते. लागलीच कन्सल्टंट डॉक्टरांच्या केबिनमध्ये धडकलो. पण माझे शब्द बाहेर पडायच्या आत त्यांनीच सुरू केले, सॉरी डॉक्टर तुमच्या मित्राला नाही वाचवू शकलो आम्ही. Government Neglect And Grievances Of Veterinary Officers!

मी निःशब्द झालो... 
 
आदित्य तर जमिनीवर खालीच बसला ! त्याला धीर देत, समजावू लागलो बाळा आपल्याला आता सत्य स्वीकारलं पाहिजे. तुला आता आई आणि बहिणीसाठी उभं राहिलं पाहिजे. पण तो काहीच बोलेना. त्याला पुन्हा सांगितले बेटा तू डॉक्टर आहेस, किमान तू तरी समजून घे. तो म्हणाला काका मला काहीच नाही समजत काय करायंच, बाहेर आईला काय सांगायाचं? अहो पप्पांच्या कामाने आमचा घात केलाय. थोडे समजावून आम्ही दोघे आतूनच ICU मध्ये असलेल्या डॉक्टरांच्या पार्थिवाकडे जाऊन बाहेर आलो.

बाहेर येताच त्या वहिनी इतक्या लगबगीने विचारायला उठल्या की कसे आहेत हे. की काही क्षण शब्दच फुटेना मला. आयुष्यातील सर्वात कठीण वाक्य बोलताना सगळी ताकद एकवटून सांगितले त्यांना. मॅडम सर नाही राहिले आपले. त्यानंतर जे घडले ते मन हेलावून टाकणारे होते.

त्या सरळ ICU च्या दरवाजाकडे पळत सुटल्या, नाही हे खोटं आहे. दरवाजा आतून लॉक होता.  त्यांनी खूप जोरात प्रयत्न केला, भिंतीवर डोके आदळून घेत होत्या, नाही हे शक्यच नाही, रात्री बोललेत ते माझ्याशी, रात्री ज्यूस घेताना सांगितलंय बरे होणार आहेत ते डॉक्टर काही तरी करा,  ते कन्सल्टंट डॉक्टर बाहेर येताच त्यांचे हात पकडून त्या विनवणी करत होत्या, त्यांना काहीच नाही झालं, वाचवा त्यांना सर, काही वेळात त्यांना कसे बसे सावरले.Government Neglect And Grievances Of Veterinary Officers!

काही सुचत नव्हते, पुन्हा अचानक त्या उठल्या मला ह्यांच्याकडे जायचे आहे, घेवून चला खूप समजावून, शेवटी काही अटी घालून, PPE कीट घालून त्यांना आत घेवून गेलो. पार्थिवाजवळ जाताच त्यांनी त्या देहाची चेस्ट प्रेस करायला सुरुवात केली, सर्व यंत्रणा अजुन जोडलेली असल्याने कुठेतरी मॉनिटर वर सिग्नल वाजला. त्यानी पुन्हा सुरू केले. नाही ह्यांना वाचवा  डॉक्टर काही तरी करा...

तिथल्या स्टाफच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांनी पुन्हा टाहो फोडला अजुन प्रयत्न करा, त्यांना वाचवा सगळे मशीन पुन्हा चालू करा मी तुमच्या पाया पडते. त्यांना काय आणि कसे समजावे हे त्यांच्या मुलाला, त्या डॉक्टर आणि मला काही कळेना. वारंवार समजावून देखील त्या तयारच होत नव्हत्या...

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com