सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम करतंय- नरेंद्र पाटील 

narendra patil
narendra patil

अकोला: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मराठा समाज रस्त्यावर आल्याशिवाय महाविकास आघाडी सरकारचे डोळे उघडणार नाही. लोकशाही पद्धतीने मराठा समाज आपला लढा उभारणार यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी हाक मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात सर्वात अगोदर करणारे मराठा महासंघाचे संस्थापक आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाला करून साथ देण्याचे साकडे घातले. नरेंद्र पाटील आज  अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु महाविकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, याची पुनर्विचार याचिका सरकारने अजून दाखल केली नाही. मराठा समाजाने ओबीसी आरक्षणातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली नाही. परंतु सत्तारूढ पक्ष मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचं काम करत आहे. सत्ता तुमची निर्णय घेणारे तुम्ही तेव्हा प्रश्न कसला निर्माण होतो, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नरेंद्र पाटील भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठा समाजातील आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्यांची भेटीगाठी करण्यासाठी अकोल्यात आले होते.  

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार भाजपातील मराठा नेते वेगवेळ्या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार व भाजपाची भूमिका यासंदर्भात मराठा समाजात जनजागृती करत आहे. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चर्चा विनिमय केला. पत्रकार परिषद मध्ये त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. (The government is quarreling between Marathas and OBCs)

तर मोर्चा काढू

जर आघाडी शासनाने यासंदर्भात लवकरच काही निर्णय घेतला नाही तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून एक मोर्चा सुद्धा सरकारच्या विरुद्ध काढण्याचा विचार आम्ही करतो आहे. सरकारला जागं करण्यासाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही. या संदर्भातील तारीख लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना कळवली जाईल, असे नरेंद्र पाटील म्हणाले. 

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com