ओबीसी आरक्षण रद्द होण्यास सरकार जबाबदार - खासदार सुनील मेंढे

अभिजीत घोरमारे
गुरुवार, 3 जून 2021

सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवेल असा इशारा ही देण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) भाजपच्या ओबीसी सेलच्यावतीनं (BJP OBC Cell) भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले, असून ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपने खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन केलं आहे.  राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपन केला आहे. (Government responsible for cancellation of OBC reservation - MP Sunil Mendhe)

सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवेल असा इशारा ही देण्यात आला आहे. देशात 52 टक्के ओबीसी आहे तर महाराष्ट्रात 27 टक्के आहे. ओबीसी समाजाला आरक्षण असतानासुद्धा हे आरक्षण घालवण्याचा काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केला आहे आणि म्हणून आम्ही ठाकरे सरकार काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या सरकारचा आम्ही निषेध करतो. परंतु ओबीसीचं आरक्षण घेण्याकरिता भारतीय जनता पक्ष सातत्याने संघर्ष करेल असा इशारा ही खासदार मेंढे यांनी दिला आहे. 

हे देखील पाहा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर विविध पर्याय समोर येऊ लागले. त्यापैकी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं का? हा पर्याय समोर आला आहे. परंतु, ओबीसी समाजाने याला स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे, येत्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? याकडे मराठा समाजचे लक्ष लागून आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live