महायुतीच्या सत्तेचं समीकरण जुळणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सत्तेतल्या फिफ्टी-फिफ्टी सुत्रावर अडून बसलेली शिवसेना चार पावलं मागे येण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेचा तोडगा काढण्यात यश मिळवल्याची चर्चा असून शिवसेनेला सोबत घेवूनच सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई - सत्तेतल्या फिफ्टी-फिफ्टी सुत्रावर अडून बसलेली शिवसेना चार पावलं मागे येण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेचा तोडगा काढण्यात यश मिळवल्याची चर्चा असून शिवसेनेला सोबत घेवूनच सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सत्तेत सहभागी होताना शिवसेनेला दोन अधिकची मंत्रीपदे, दोन राज्यपाल पदे यासह एखादी राज्यसभा व तीन विधानपरिषद मिळतील असा दावा सुत्रांनी केला आहे. 

दरम्यान, शिवसेना मुख्यमंत्री पद व सत्तेतल्या अर्ध्या सहभागाचा दावा सोडणार काय असा सवाल केला जात आहे. 

मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस हेच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज युतीच्या सत्तास्थापनेला वेग मिळाला. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही युतीच्या सत्तास्थापनेत मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचे समजते. उध्दव ठाकरे यांनी भाजप सोबतच सत्तेत सहभागी व्हावे अशी त्यांची भावना होती. 

शिवसेनेचे संख्याबळ पाहता मुख्यमंत्रीपद देणे शक्यचं नसल्याची भाजपच्या नेत्यांची भूमिका होती. मात्र त्याबदल्यात काही मंत्रीपदे वाढवून दिली जातील अशी ग्वाही देण्यात आली. यामधे कृषी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास या चार पैकी दोन मंत्रीपदे शिवसेनेला मिळतील असे मानले जात आहे. 

दरम्यान, राज्यातील ओला दुष्काळात शेतकरी बाधित झालेला असताना सत्तास्थापनेत फारसे ताणून चालणार नाही. राज्यात अशावेळी राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी शिवसेनेतील काही नेत्यांची भूमिका होती. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांचे मत आहे.

 

Web Title: government shivsena bjp mahayuti politics


संबंधित बातम्या

Saam TV Live