VIDEO | तुमचा मोबाईल शोधणार सरकार

ब्युरो रिपोर्ट, सामटीव्ही
गुरुवार, 2 जानेवारी 2020

 फोन हरवला किंवा चोरीला गेला तर त्याची जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार करा..फोनमधील आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यासाठी ceir.gov.in या पोर्टलवर जा..त्यासाठी नोंदणी केल्यानंतर आयएमईआय क्रमांक ब्लॉक होईल. फोन मिळाल्यानंतर आयएमईआय अनब्लॉक करता येईल.

तुमचा मोबाईल फोन चोरीला गेला तर आता चिंता नको...कारण तुमचा फोन स्वतः सरकारच शोधून देईल...आश्चर्य वाटलं ना..पण हे खरंय..केंद्र सरकारनं आता एक वेब पोर्टल तयार केलंय..त्यावर तुमच्या चोरीला  गेलेल्या मोबाईल फोनचा ठावठिकाणा लगेचच कळेल..

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स अर्थात सीडीओटीनं हे पोर्टल तयार केलंय..सप्टेंबर महिन्यापासून त्याच्या चाचण्या सुरू आहेत..हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल फोनच्या शोधासाठी सेंट्रल रजिस्ट्री सिस्टिमची निर्मिती करण्यात आलीय..देशातल्या सर्व मोबाईल ऑपरेटरकडे असलेल्या आयएमईआयच्या डेटा बेसशी ते जोडलं गेलंय..टेलिकॉम ऑपरेटरकडे हा डेटा असल्यानं त्यांना फोनचा थांगपत्ता कळेल..त्यामुळे चोरीला गेलेला किंवा हरवलेल्या फोनचा गैरवापरही टळेल..ceir.gov.in नावाचं हे पोर्टल आहे..

 फोन हरवला किंवा चोरीला गेला तर त्याची जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार करा..फोनमधील आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यासाठी ceir.gov.in या पोर्टलवर जा..त्यासाठी नोंदणी केल्यानंतर आयएमईआय क्रमांक ब्लॉक होईल. फोन मिळाल्यानंतर आयएमईआय अनब्लॉक करता येईल.
सध्या तरी हे वेब पोर्टल दिल्ली आणि मुंबईसाठी आहे...मात्र, हरवलेल्या फोनचा गैरवापर होऊ नये, यासाठी त्याची नक्कीच मदत होईल..

WebTittle : The government will search your mobile

संबंधित बातम्या

Saam TV Live