१० वी १२वी च्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय - वर्षा गायकवाड

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या आधीच जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी आज सांगितले

मुंबई : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी या आधीच जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी आज सांगितले. Government will take decision about Tenth and twelve std Exam soon Say Varsha Gaikwad 

वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण Education अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यात ९ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत चर्चा झाली. राज्यातील ९ वी आणि ११ वीच्या परिक्षांबाबत Examinations येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असून १० वी व १२ वी च्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करुन काय ते ठरविण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.  

आपण कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत आहोत. पण आता कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देणार आहोत, असे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. Government will take decision about Tenth and twelve std Exam soon Say Varsha Gaikwad 

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रदर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामध्ये नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत कोणता निर्णय हाती घेतला जाईल, याकडे  सर्वांचं लक्ष लागले आहे.
Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live