सरकारी काम आणि 8 दिवस थांब ,कोरोना रिपोर्टची आठवड्यापासून प्रतीक्षा

SAAM TV
शनिवार, 13 मार्च 2021

सरकारी काम आणि 8 दिवस थांब
कोरोना रिपोर्टची आठवड्यापासून प्रतीक्षा
एकीकडे कठोर नियम दुसरीकडे भोंगळ कारभार

 

 फेब्रुवारी महिन्यापासून नाशकात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. 10 मार्चपासून नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊनदेखील लागू करण्यात आलंय. एकीकडे ही परिस्थिती असतांना दुसरीकडे मात्र आरोग्य यंत्रणांचा भोंगळ कारभार समोर आलाय. कोरोना संशयितांना RTPCRच्या रिपोर्टसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागतेय. टेस्टिंगची वाढलेली संख्या आणि औरंगाबादच्या शासकीय लॅबमध्ये बिघाड झाल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतंय. असं असलं तरी रुग्णसंख्या वाढत असतांना लॅबची क्षमता आणि किट्सची संख्या वाढवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचंही स्पष्ट होतंय. मात्र यामुळे गेल्या 7 दिवसांपासून 500 हून स्वॅब लॅबमध्ये प्रलंबित आहेत.

रिपोर्टला उशिर होत असल्यानं उपचारालाही विलंब होतोय. रिपोर्ट अभावी लक्षणं असलेले आणि लक्षणं नसलेले रुग्णही बाहेर फिरतायत. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊन रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. कोरोना पुन्हा हातपाय पसरत असतांना आरोग्य यंत्रणांकडून लॅबची संख्या आणि क्षमता का वाढवण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित होतोय. या प्रश्नाचं उत्तर वेळीच मिळालं नाही तर 

नागरिकांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कठोर करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय. सध्याची चिंताजनक परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला वेळीच रोखायचं असेल तर यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे


संबंधित बातम्या

Saam TV Live