म्युकरमायकोसीसबाबत सरकारची घोषणा फसवी- देवेंद्र फडणवीस

mu 1
mu 1

गोंदिया: राज्य सरकारने म्युकरमायकोसीसच्या रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती, मात्र राज्यात कुठेही म्युकरमायकोसीस रूग्णांवर कुठेही मोफत उपचार करण्यात येत नाही. त्यामुळे ही महाविकास आघाडी सरकारची घोषणा फसवी असून म्युकारमायकोसीसचा रूग्ण कोणत्याही रूग्णालयात भरती असेल तर त्याला मोफत इंजेक्शन देण्यात यावे. अशी आमची इच्छा असून महाविकास आघाडी सरकार बनवाबनवी करतेय असे मी म्हणणार नाही पण सरकारने जनताभिमुख कामे करण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते गोंदियात आले असता पत्रकारांशी बोलत होते. तर धान खरेदीची परिस्थिती अंत्यत भयावह असून धान खरेदीत शेतकऱ्यांची चक्क फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी करीत महाविकास आघाडी सरकार कोरोना रूग्णांची आणि मृतकांची आकडेवारी लपवित असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Government's announcement about mucormycosis is fraudulent devendra fadnavis)

हे देखील पाहा

कोरोना विषाणूनंतर देशात काळी बुरशी (Black Fungus) आणि पांढऱ्या बुरशीचे (White Fungus) अनेक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात दोन्ही बुरशीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पिवळ्या बुरशीचा (Yellow fungus) पहिला रुग्ण देशात आढळून आला. पिवळ्या बुरशीचा हा जगातील पहिलाच रुग्ण असून तो भारतात आढळून आला आहे. तथापि, पिवळ्या बुरशीचा प्रकार समोर आल्यानंतर अनेक डॉक्टरांमध्ये याबाब चर्चा सुरू झाली आहे. बुरशीचे अनेक प्रकार असतात त्यात आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळून आला आहे, असा अंदाज काही डॉक्टर्स बांधत आहेत. मात्र काही तज्ञांनी हा अंदाज फेटाळून लावला आहे. अद्याप कोणताही डॉक्टर पिवळ्या बुरशीबद्दल अधिकृतपणे बोलायला तयार नाही.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com