चार संशयितांविरोधात उद्या पुरवणी दोषारोपपत्र?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांविरोधात सोमवारी (ता. ११) जिल्हा सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्‍यता असल्याने तपास यंत्रणा गतिमान झाली आहे. याआधी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहे.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने आठ संशयितांची निश्‍चिती केली आहे. यातील पहिला संशयित समीर गायकवाड, दुसरा संशयित वीरेंद्र तावडे यांच्याविरोधात याआधी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे; तर तिसरा संशयित सारंग अकोलकर व चौथा संशयित विनय पवार यांना फरारी घोषित केले आहे.

एसआयटीने १५ नोव्हेंबरला याप्रकरणी अमोल काळे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. यानंतर १ डिसेंबरला वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणे यांचा ताबा घेतला होता, तर १५ जानेवारीला अमित डेगवेकर या संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती.

यातील पाचवा संशयित अमोल काळे याच्या ताब्याला मंगळवारी (ता. १२) ९० दिवस पूर्ण होत आहेत. त्या आदी त्याच्या विरोधातील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे आवश्‍यक होते. त्यामुळे अमोल काळे व अन्य चार संशयितांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याच्या हालचाली तपास यंत्रणांकडून सुरू आहेत. सोमवारी (ता. ११) पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाण्याची शक्‍यता असून, यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर दोषारोपपत्र सादर केले जाऊ शकते. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी व पुरावे या पुरवणी दोषारोपपत्रामध्ये सविस्तरपणे मांडले जाणार असल्याची शक्‍यता असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Govind Pansare murder case follow up

संबंधित बातम्या

Saam TV Live