गावात ग्रामपंचायतींच्या निवडणुका धुमधडाक्यात पार पडल्या

SAAM TV
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

राज्यातील 14 हजार 234 गावात ग्रामपंचायतींच्या निवडणुका  पार पडल्या. निवडणुकीनंतर सरपंचपदाचं आरक्षणही जाहीर झालंय. मात्र अनेक गावांना शासकीय अनागोंदीचा फटका बसलाय. सरपंच कुणाला करावं यावरून पेच निर्माण झालाय.| 

राज्यातील 14 हजार 234 गावात ग्रामपंचायतींच्या निवडणुका धुमधडाक्यात पार पडल्या. निवडणुकीनंतर सरपंचपदाचं आरक्षणही जाहीर झालंय. मात्र अनेक गावांना शासकीय अनागोंदीचा फटका बसलाय. सरपंच कुणाला करावं यावरून पेच निर्माण झालाय. 

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर गावागावात जल्लोष पाहायला मिळाला. काही गावातील निवडणूक बिनविरोध तर काही गावात अंशतः बिनविरोध निवडणूक झाली. निवडणुकीनंतर सर्वांनाच वेध लागले होते ते सरपंचपदाच्या आरक्षणाचे...पण आता याच आरक्षणावरून लोकप्रतिनिधींच्या तोंडचं पाणी पळालंय. राज्यातील अनेक गावांमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर त्या गावात त्या प्रवर्गातील सदस्यच निवडून आला नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता सरपंच कुणाला करायचं..हाच प्रश्न अख्ख्या गावासमोर पडलाय. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या एकतुनी, आडूळ खुर्द, ढाकेफळ या गावात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव सरपंचपद जाहीर झालं. मात्र, तिथे त्या प्रवर्गातील महिलाच निवडून आलेली नाही. हीच गत सिल्लोड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये झालीय.  अनूसूचित जमातीसाठी सरपंचपद राखीव असतांना इथं उमेदवारच निवडून आला नसल्यामुळे याठिकाणी सरपंचपद रिक्त रहाण्याची परिस्थिती आहे. 

  गावच्या सरपंच पदाची निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची निवडणूक असते. पॅनल कुणाचं निवडून आलं, यापेक्षा सरपंच आपल्या पॅनलचा अशी स्वप्न पाहणाऱ्या गावकऱ्यांना शासकीय अनास्थेमुळे मोठा धक्का बसलाय..सरकारी बाबू मंडळींनी घातलेला हा गोंधळ निस्तारण्यासाठी लोकप्रतिनिधींना आता कोर्टाची पायरी चढावी लागतेय. 
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live