द्राक्ष बागांना १२० कोटींचा दणका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

 

नाशिक -  द्राक्षपंढरीतील बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशाला १२० कोटींचा आतापर्यंत अतिरिक्त दणका बसला आहे. तसेच लांबलेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामातील ऑक्‍टोबर गोडी छाटणी पंधरा दिवसांनी लांबणार हे स्पष्ट झाले.

 

नाशिक -  द्राक्षपंढरीतील बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशाला १२० कोटींचा आतापर्यंत अतिरिक्त दणका बसला आहे. तसेच लांबलेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामातील ऑक्‍टोबर गोडी छाटणी पंधरा दिवसांनी लांबणार हे स्पष्ट झाले.

पाऊस अधिक झाल्यावर आर्द्रता वाढते. त्यातून डावणी आणि करप्याचा प्रादुर्भाव वाढतो. यंदा करप्याचा प्रादुर्भाव कमी असला, तरीही डावणीने ग्रासलेले क्षेत्र मोठे आहे. याखेरीज स्पोडोप्टेरा लिट्युरा अळीने थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पांढरी मुळी अडचणीत सापडली. परिणामी बागेत वरच्या भागात मुळ्या फुटण्यास सुरवात झाली. तसेच घड जिरण्यास सुरवात झाली आहे. या साऱ्या प्रश्‍नांच्या झळा रंगीत फ्लेम सीडलेस, शरद सिडलेस, जम्बो, नाना जम्बो, मामा जम्बो, नाना परपल, क्रिमसन या वाणाच्या द्राक्षबागांना बसल्या आहेत. जिल्ह्यातील दोन लाख एकरपैकी ‘अर्ली’च्या २० आणि नंतरच्या काळात इतर २० टक्के अशा ४० टक्के बागांच्या छाटण्या उरकल्या आहेत. त्यापैकी ३५ टक्के क्षेत्र रंगीत वाणाचे आहे. एक ते वीस सप्टेंबर या कालावधीत छाटलेल्या ३० हजार एकरांवरील बागांना अतिरिक्त खर्चाने ग्रासले आहे. एकरांतून १० टन द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी अडीच लाखांचा खर्च होतो. त्यात नियमित फवारण्यांचा खर्च दीड लाखांपर्यंत असतो. पण, बागांमध्ये तयार झालेल्या प्रश्‍नांमुळे शेतकऱ्यांचा एकरी ४० हजारांचा खर्च वाढला आहे. हा प्रश्‍न प्रामुख्याने निफाड, दिंडोरी, बागलाण, चांदवड आणि नाशिक  तालुक्‍यात उद्‌भवला आहे.
 
Web Title: grape garden issue
 


संबंधित बातम्या

Saam TV Live