75 लाख शेतकरी, वीज ग्राहकांना मोठा दिलासा

साम टीव्ही
बुधवार, 3 मार्च 2021

वीज बिल थकबाकीदारांना महावितरणनं कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली होती. तर काही ठिकाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरु झाली होती. 

वीज बिल थकबाकीदारांना महावितरणनं कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली होती. तर काही ठिकाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरु झाली होती. पण विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर सरकारनं कारवाईला स्थगिती दिलीय.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांचं वीज बिल थकलं  महावितरणनंही या काळात रिडिंग घेणं बंद केलं होतं. त्यामुळं वीज बिलांमध्येही गोंधळ झालाय. लॉकडाऊनच्या काळानंतर राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांचं वीज बिल थकलं. त्यांचे वीज कनेक्शन कापायला सुरुवात केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरासरी वीज बिल देणं बंद करण्याच्या सूचना केल्या.

लोकभावना आणि विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचं वीज कनेक्शन कापणार नसल्याची घोषणा केलीय.

सरकारनं वीज कनेक्शन तोडण्यासाठी स्थगिती दिलीय. हा तात्पुरता दिलासा असला तरी सरकारनं यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी सामान्यांमधून होतेय.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live