सोलापूर शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकाने, मंडई उद्यापासून सुरू होणार

विश्वभूषण लिमये
शुक्रवार, 14 मे 2021

शहर आणि जिल्ह्यात यापूर्वी लागू झालेला लॉकडाऊन १५ मे पासून पुढेही लागू राहील, परंतु अत्यावश्यक सेवेतील सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील किराणा दुकाने भाजी मंडई तसेच इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

सोलापूर  : शहर आणि जिल्ह्यात यापूर्वी लागू झालेला लॉकडाऊन १५ मे पासून पुढेही लागू राहील, परंतु अत्यावश्यक सेवेतील सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील किराणा दुकाने भाजी मंडई तसेच इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. परंतु याठिकाणी गर्दी आढळल्यास १०० टक्के कारवाई होईल, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिलीय. Grosser Shops in Solapur will be open from Tomorrow 

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज  बैठक घेतली. नियोजन भवनात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन लागू केला आहे.

उजनीच्या पाण्याच्या आंदोलनात शिवसेना माजी आमदाराचा पुढाकार

१५ मे च्या सकाळी ७ पर्यंत या लॉक डाउन संबंधित निर्बंध लागू आहेत. त्यानंतर पुढेही लागू राहतील. परंतु या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा राहील. अत्यावश्यक सेवा ठिकाणी लोकांनी अनावश्यक गर्दी करू नयेत,  लोकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावेत. अन्यथा पोलीस विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत,असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. 

Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live