पेट्रोलच्या दरात 'विकास' सुरूच !

petrol
petrol

परभणी : मे महिन्यात इंधनाच्या Fuel दरात 16 पेक्षा अधिक वेळा तेल कंपन्यानी वाढ केली होती. जून मध्येही आठवड्यात तिसऱ्या वेळेस इंधनाच्या दरात Price वाढ झाली आहे.परभणीत पेट्रोलच्या दराने दीड महिन्यापूर्वीच शंभरी ओलांडली आहे.

परभणी Parbhani येथे पेट्रोल Petrol डिजेलची Diesel दरवाढ ही नित्याचीच झाली असून ह्या दरवाढीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसाय बंद, हाताला काम नाही अश्यात इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे.

परभणीत ह्या महिन्यात तिसऱ्या वेळेस वाढ झाली आहे. परभणीत दोन दिवसापूर्वी पेट्रोलचा दर 103 ₹ 39 पैसे होता त्यात आज 26 पैसे वाढ होत 103 ₹ 56 पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर 93 ₹ 79 पैसे होता त्यात 30 पैसे वाढ होत आता 94 ₹ 09 पैसे झाला आहे. 

हे देखील पहा -

तर पावर पेट्रोलदर 106 ₹ 97 पैसे झाला आहे. मागील दोन महिन्यापासून सातत्याने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. केंद्र Central आणि राज्य State सरकार Government ने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी आशी मागणी सातत्याने होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com