तौक्ते वादळात झालेल्या नुकसानाची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

Eknath Shinde
Eknath Shinde

अंबरनाथ : ठाणे Thane जिल्ह्यातील अंबरनाथ Ambarnath, कल्याण Kalyan तालुक्यातील ग्रामीण भागाला तौक्ते Tauktae वादळाने Cyclone चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, घरांचे आणि बागांचे नुकसान Damage झाले आहे. Guardian Minister Eknath Shinde Inspects The Damage Caused By 'Tauktae'

हे देखील पहा -

आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde पाहणी दौरा Inspection केला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या घरांवरील पत्रे देखील उडाल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे.या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड परिसरासह चिरड, नेवाळी या अंबरनाथ ग्रामीण भागाचा जिल्हाधिकाऱ्यांसह दौरा करत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.Guardian Minister Eknath Shinde Inspects The Damage Caused By 'Tauktae'

या वादळात कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील  बाधित कच्ची घरे 22, बाधित पक्की घरे 3,अंशतः बाधित कच्ची घरे 1945 ,बाधित पक्की घरे 158, गाई-म्हशींचे गोठे 18, मृत पशुधन 3 आणि 362 हेकटर मध्ये आंबा,केळी,काजू बागांचे नुकसान झाले आहे. 

932 शेतकरी या वादळामुळे नुकसान बाधित झाले आहेत. तर तीन व्यक्तींचा दुर्दवी मृत्यू झाला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. सर्वत्र तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.  Guardian Minister Eknath Shinde Inspects The Damage Caused By 'Tauktae'

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com