26 जानेवारी नंतर थेट काल प्रकटले उस्मानाबादचे पालकमंत्री 

विश्वभूषण लिमये
मंगळवार, 20 एप्रिल 2021

उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमानंतर थेट कालच जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबादमध्ये दाखल झाले होते. 

उस्मानाबाद: उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित Corona रुग्णांचा आकडा वाढत आहे. आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं  देखील प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करावे असे तेथील प्रशासन Administration ओरडून ओरडून सांगत आहे. अनेक मंत्री स्थानिक पातळीवर येऊन लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतात. अशातच उस्मानाबादचे पालकमंत्री Guardian Minister शंकरराव गडाख Shankarrao Gadakh हे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमानंतर थेट कालच जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबादमध्ये दाखल झाले होते. The Guardian Minister of Osmanabad inspected the Corona situation yesterday
 
दरम्यानच्या काळात पालकमंत्र्यांना कोरोनाची लागणं झाली होती. कोरोना झाल्याने ते स्वतः क्वारंटाईन Quarantine झाले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ते जिल्ह्याचा आढावा Inspect घेण्यासाठी उस्मानाबादमध्ये दाखल झाले. मागच्या 15 दिवसांच्या काळामध्ये रेमडीसीवीर Remidicivir, ऑक्सिजन बेड Oxygen Beds, व्हेंटिलेटरचा Ventilator तुटवडा मोठ्या प्रमाणात उस्मानाबादमध्ये जाणवत असल्याच पहायला मिळतं आहे. यातून लवकरच मार्ग काढला जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी जनतेला दिले.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live