पालकमंत्री कचरा कर त्वरित रद्द करा; डोंबिवली शहरात सर्वत्र झळकले बॅनर

dombivali.
dombivali.

केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुली एप्रिल महिन्यापासून सुरू झाली आहे.  प्रथम सहामाही रुपये 300 व द्वितीय सहामाही 300 असे एकूण 600 रुपये आता मोजावे लागणार आहेत. या शुल्क वसुलीला भाजपाने (BJP) विरोध केला असून याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण (MLA Ravindra Chavan) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हा कर रद्द करावा अशी मागणी केली आहे. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. यावेळी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr.Shrikant Shinde) आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर टिका केली.(Guardian Waste Tax Immediately Cancel Banners were hoisted all over the city of Dombivli)

या टिकेला उत्तर देत खासदारांनी सांगितले की आयुक्त हे चांगले काम करीत आहेत. शहराच्या हिताचे निर्णय घेतात त्याबाबत कुणीही राजकारण करू नये काही समस्या, मागण्या असतील तर प्रत्यक्षात भेट घेऊन मांडाव्यात असे सांगितले.  पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शासन निर्देशाप्रमाणे निर्णय घेतलाय ,बहुतांश महापालिका नगरपालिकांनी या आदेशाची अमलबजावणी केलीय त्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील केल्याचं स्पष्ट केले आहे.
 
आता या करावरून सेना भाजपचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने डोंबिवली शहरात सर्वत्र बॅनर लावून अहो पालकमंत्री कचरा कर त्वरित रद्द करा, अशी मागणी केली आहे. तसेच केडीएमसीत हा थुकरटपणा कशाला, विश्वस्थ आहात मालक नाही सेवा वाढवा कर नाही, कचरा कर लादणाऱ्या केडीएमसीचा निषेध अशा प्रकारचे बॅनर लावले आहेत. हे बॅनर गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवली शहरात चर्चेचा विषय ठरल्याने आता शिवसेनेसुद्धा भाजप आमदारांना सवाल केला आहे. शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी याबाबत सांगितले की कर लावायचा तेव्हा चव्हाण मंत्रिमंडळात होते, तेव्हा त्यांनी या कराला विरोध का केला नाही?  देवेंद्र फडणवीस यांनी बनविलेला हा कायदा चुकीचा आहे असे चव्हाण यांचे म्हणणे आहे का ते त्यांनी स्पष्ट करावे.

आमदार दिलीप मोहिते पाटील हे राजकारणाला लागलेली काळी बुरशी - आढळराव पाटील  
 
याला उत्तर देताना भाजप आमदार चव्हाण म्हणाले, लहान बुद्धी असल्याचा प्रकार आहे हा जीआर निघाल्यानंतर महासभेत आला, पार्टी म्हणून तो निर्णय घेतला की लावायचा नाही याचा अर्थ काय. कर लागलाच नाही तर गवगावट कशाला करायचा. लागल्यानंतर मी बोलणारच ना.  एवढेच नाही तर कर प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत सदर कराला स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.
 
सेना भाजपच्या या राजकरणावरती मनसेचे जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सेना भाजपवर टीका करत सांगितले, हे दोन्ही पक्ष टॉम अँड जेरीचा खेळ खेळत असून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे नेत आहेत. सेनेला खरच कर कमी करायचा असेल तर सरकार तुमचे आहे. भांडण करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडून कर कमी करून घ्या असा टोला लगावला. आता या तिन्ही पक्षातील राजकारण कोणत्या शिगेला पोहोचणार आणि खरच कर रद्द होणार का? हे पहावे लागेल.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com