गुजरात शोधणार कोरोनावर अनोखं औषध? गोमुत्र, शेणापासून कोरोनावर औषध ?

साम टीव्ही
शुक्रवार, 29 मे 2020
  • गुजरात शोधणार कोरोनावर अनोखं औषध ?
  • कोरोनावर होणार आयुर्वेदिक उपचार ?
  • गोमुत्र, शेणापासून कोरोनावर औषध ?

गुजरातमध्ये कोरोनावर एक वेगळंच औषध शोधलं जातंय. त्यासाठी आयुर्वेदाचा आधार घेतला जातोय. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट...

गुजरातमध्ये कोरोनावर एका अनोख्या औषधाची चाचणी अंतिम तयारीत आहे. पंचगव्य अर्थात गायीचं दूध, लोणी, तूप, गोमुत्र आणि शेण यापासून एका औषधाची निर्मिती करण्यात आलीय. अहमदाबाद आणि सुरतमध्ये या औषधाच्या चाचण्या सुरु असल्याची माहिती मिळतेय. गोमुत्र आणि शेण यांना आयुर्वेदात महत्त्वाचं स्थान आहे. त्यापासूनच कोरोनाविरोधात लढण्यासाठी औषध शोधण्याचा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलाय. 

देशातील 10 हॉस्पिटल्समध्ये पंचगव्यावर आधारित औषधाची चाचणी केली जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मतदारसंघ असलेल्या राजकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या औषधावर चाचणी केली जाणार आहे. दुधाच्या भुकटीप्रमाणे हे औषध असेल असं सांगितलं जातंय. 

जगातील 100 हून अधिक देश कोरोनावर लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्राचीन भारतीय वैद्यकीय संस्कृतीची ओळख असणाऱ्या आयुर्वेदातनं जर कोरोनावर उपचार म्हणून औषध मिळालं, तर भारतासाठी ती नक्कीच अभिमानास्पद बाब असेल. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live