नागपूरमधील गुंडाराजला झटका : तुकाराम मुंडे व पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडे!

सरकारनामा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

आंबेकरवर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची फाईल बाहेर काढत त्याची धींड काढत न्यायालयात हजर केले होते. दुसरीकडे संतोष आंबेकरने इतवारीत हमालपुऱ्यातील घर अतिक्रमन केलेल्या जागेवर बांधल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मनपाला पत्रव्यवहार करून पोलिसांनी आंबेकरचे घराचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी मनपाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता अतिक्रमण कारवाईला प्रारंभ झाला होता. आंबेकरने तीन प्लॉटला जोडून मोठा बंगला बांधला होता.

नागपूर : गुन्हेगारी जगतातील दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या इतवारीतील घरावर मनपाच्या अतिक्रमन विभागाने कारवाई करीत तोडून टाकले. डॉन आंबेकर थेट रस्त्यावर आला असून गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. सध्या डॉन आंबेकर हा बलात्कार, मोक्‍का, खंडणी, वसुली आणि जीवे मारण्याची धमकी देणे आणि व्यापाऱ्याचे अपहरण करण्याच्या प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.

 डॉन संतोष आंबेकरने महाराष्ट्रासह अन्य राज्यात आपली दहशत पसरवित मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीची खंडणी वसुल केली आहे. आंबेकरच्या टोळीतील प्रत्येक सदस्याकडे पिस्तूल असल्यामुळे तसेच त्याच्यावर अनेक खंडणीचे आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याची दिवसेंदिवस हिम्मत वाढत होती. आयपीएस अधिकारी नीलेश भरणे आणि पोलिस उपायुक्‍त गजाजन राजमाने यांनी गुन्हे शाखेचे सूत्र हाती घेताच आंबेकरला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

आंबेकरवर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची फाईल बाहेर काढत त्याची धींड काढत न्यायालयात हजर केले होते. दुसरीकडे संतोष आंबेकरने इतवारीत हमालपुऱ्यातील घर अतिक्रमन केलेल्या जागेवर बांधल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मनपाला पत्रव्यवहार करून पोलिसांनी आंबेकरचे घराचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी मनपाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता अतिक्रमण कारवाईला प्रारंभ झाला होता. आंबेकरने तीन प्लॉटला जोडून मोठा बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे होता. ज्याचे 60.15 चौरस मिटर बांधकाम हे अनधिकृत होते. दुसरा प्लॉट अमरचंद मदनलाल मेहता यांचे नावे होता. ज्यावर त्याने 721.56 चौरस मिटर अनधिकृत निर्माण कार्य केले होते. तिसरा प्लॉट संतोष आंबेकरच्या स्व:ताच्या नावावर होता. त्याचे 21.30 चौरस मिटर बांधकाम हे देखील अनधिकृत होते. तिन्ही प्लॉटवर 803 चौरस मिटर (8640.28 चौरस फुट) बांधकाम हे अनधिकृत होते.

अतिक्रमण विरोधी पथकाने 2 जेसीबी व 1 पोकलेनच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. म.न.पा.उपायुक्त महेश मोरोणे व पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विरोधी कारवाईला लकडगंज पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. लकडगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिरवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश चौधरी व म.न.पा.चे सहा.आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्यासह त्यांची चमू या कारवाईत सहभागी होती. 

कोट्यवधीचा बंगला क्षणार्धात "भुईसपाट' 
डॉन आंबेकर याने राजस्थान, पश्‍चिम बंगाल आणि गुजरात येथील कारागीर आणून कोट्यवधी रूपयांचा खर्च करून टोलेजंग बंगला बांधला होता. या बंगल्यात महागडे लाकूड आणि नक्षीकाम केलेले होते. अतिक्रमन विभागाच्या ताफ्याने थेट जेसीबीने बंगला पाडण्यास सुरूवात केल्यानंतर क्षणार्धात टुमदार बंगला भुईसपाट झाला. 

इतवारीला छावणीचे स्वरूप 
डॉन आंबेकरचा बंगला पाडत असल्याची वार्ता शहरभर पसरल्यामुळे अनेकांनी कारवाई पाहण्यासाठी गर्दी केली. तसेच गुन्हेगारी जगतातील काहींनी गुपचूप कारवाई पाहण्यासाठी हजेरी लावली. तर आंबेकरच्या टोळीतील सदस्यांनीही सकाळपासूनच गर्दी केली होती, अशी माहिती आहे. आंबेकरच्या साम्राज्याला खऱ्या अर्थाने बंगला पाडल्यामुळे सुरूंग लावगल्याची चर्चा आहे. 
 

WebTittle ::  Gundaraj hit in Nagpur: Little to praise Tukaram Munde and police!


  


संबंधित बातम्या

Saam TV Live