मराठा आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला झालाय. मुंबई हायकोर्ट परिसरात गुणरत्न सदावर्ते माध्यम प्रतीनिधींशी बोलत असताना एका अज्ञात व्यक्तीने गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण करण्यास सुरवात केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैजनाथ पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती मुळची जालन्याची आहे. 

गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत असलेल्या इतर वकिलांनी या व्यक्तीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आजूबाजूच्या इतरांनीही गुणरत्न सदवेर्ते यांना मारहाण केली. गुणरत्न सदवेर्ते यांनी याआधीच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रार भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. 

WebTitle : gunratna sadavarte advocate who filed petition to oppose maratha reservation bill attacked 

संबंधित बातम्या

Saam TV Live