धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून १ कोटींहून अधिकचा गुटखा जप्त

भूषण अहिरे
गुरुवार, 13 मे 2021

धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवैधरित्या वाहून नेणारा गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. या कारवाईमध्ये  तब्बल 1 कोटी 37 लाख 28 हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तर 15 लाख रुपये किंमतीचे तीन आयशर ट्रक असा एकूण 1 कोटी 52 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

धुळे : गेल्या काही महिन्यांपासून धुळे Dhule शहरातील अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व धुळे पोलीस Police अधिक आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत. या अनुषंगानेच धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  Local Crime Investigation Department अवैधरित्या वाहून नेणारा गुटख्याचा Gutkha साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. Gutkha Seized By Dhule Local Crime Investigation Department

तीन ट्रकमधून हा गुटखा व पानमसाला वाहून नेला जात असताना साक्री रोडवरील सुरत बायपास रोडवरील महेंद्र हॉटेल या ठिकाणी गुटख्याचे भरलेले आयशर ट्रक उभे असल्याची गुप्त माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर सदर ठिकाणी तात्काळ पोहोचून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली आहे.

हे देखील पहा -

या कारवाईमध्ये  तब्बल 1 कोटी 37 लाख 28 हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तर 15 लाख रुपये किंमतीचे तीन आयशर ट्रक असा एकूण 1 कोटी 52 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. Gutkha Seized By Dhule Local Crime Investigation Department

तसेच या कारवाई दरम्यान 2 आरोपींच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींची सध्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे कसून चौकशी सुरू असून हा गुटका कुठून व कुणासाठी नेला जात होता.

जुन्नर तालुक्यात आढळला म्यूकोरमायकोसिसचा पहिला रूग्ण.

 

यामागील सूत्रधार कोण याचा  संपूर्ण तपास आता पोलिसांतर्फे सुरू असून लवकरच या सर्व प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचा विश्वास पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी व्यक्त केला आहे. या कारवाई संदर्भातील सर्व माहिती त्यांनी धुळे पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Edited By : Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live