आर्थिक पॅकेजसाठी दिव्यांग उतरले रस्त्यावर

handicapped.jpg
handicapped.jpg

कोरोनाच्या  Covid 19 पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या handcapped मदतीसाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज Financial package  जाहीर करावं, यासाठी आज दिव्यांग कल्याण आयुक्तालयासमोर  Commissionerate of Disability Welfare भिकमागो आंदोलन करण्यात आलं. दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील दिव्यांग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. लॉकडाऊनमुळे Lockdown सर्व बंद असल्याने त्यांना घरातच बसावे लागत आहे. अशी माहिती प्रहार अपंग संघटनेचे धर्मेंद्र सातव यांनी दिली आहे. (Handicapped  took to the streets for a financial package) 

तर हरिदास शिंदे यांनी कोरोनामुळे दिव्यागावर ओढवलेल्या संकटाकडे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे रोजगार गेला, उद्योग धंदे बुडाल्यामुळे अनेक दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. याशिवात इतरही मुलभूत सुविधा मिळविण्यातदेखील अडचणीचे येत आहे. सरकारने लॉक डाऊनच्या काळात कामगार, मजूर, रिक्षावाले, पथारी वाले, व इतर वर्गांसाठी विशेष मदत जाहीर केली. परंतु ज्यांना दोन हात, दोन पाय, दोन डोळे नाहीत, मतिमंद, अतितीव्र अशा दिव्यांग प्रवर्गासाठी सरकारने कुठलीच मदत दिलेली नाही. त्यामुळे सरकारने अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून दिव्यांगांना मदत करावी, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या मदतीसाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं म्हणूण  दिव्यांग कल्याण आयुक्तालयासमोर भिकमागो आंदोलन करुन सरकारचे दिव्यांगांच्या समस्यांकडे लक्ष वेधत आहे. कारण या सरकारने दिव्यांग अधिकार कायद्यानुसार कोरोनाच्या काळात दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना केलेली नाही. केवळ परिपत्रक काढून दिव्यांग लसीकरण व उपचाराला प्राधान्य देऊन अंमलबजावणी कोण करणार? दिव्यांगांची सुरक्षा फक्त कागदावरच केली जाते त्यामुळे दिव्यांगांना भिक मागण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही, असे हरिदास शिंदे यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com