आळंदीतली हनुमान जयंती भक्तांविनाच; पण उत्साह कणभरही कमी नाही!

रोहिदास गाडगे
मंगळवार, 27 एप्रिल 2021

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान' असे म्हणत आज आळंदीत Alandi श्री हनुमान जयंती Hanuman Jayant साजरी करण्यात आली.

आळंदी : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान' असे म्हणत आज आळंदीत Alandi श्री हनुमान जयंती Hanuman Jayant साजरी करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे भक्तगण नसला तरीही महाबली हनुमानाला संकट दूर करण्याचे साकडे घातले गेले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या Saint Dnyaneshwar संजीवन समाधी मंदिरात विविध रंगाच्या फुलमाळांनी सजावट करुन हनुमानाची  प्रतिकृती फुलमाळांमध्ये रेखाटण्यात आली आहे. Hanuman Jayant Celebrated in Alandi amid covid restrictions

भक्तांविना साजरी होत असलेल्या हनुमान जन्मोत्सवावर 'कोरोना' चे सावट आहे. पण उत्साह मात्र कमी झालेला नाही. मागील वर्षभरापासुन कोरोनाच्या Corona महामारीच्या संकट काळात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र परंपरेनुसार सण, उत्सव, विविध देव देवतांच्या जन्मोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने समाधी मंदिरात फुलमाळांची Flower सजावट करण्यात येते. तशी ती आजही करण्यात आली आहे.

आज पहाटे माऊलींच्या समाधीवर दुग्धाभिषेक करुन महाआरती करण्यात आली त्यानंतर हनुमान जन्मोत्सवाचे पठन करण्यात आले.कोरोनाचा संसर्ग दिवसेदिवस वाढत असल्याने 'ब्रेक द चेन; या मोहिमेतुन कडक निर्बंध प्रशासनाकडुन लावण्यात आले आहे. Hanuman Jayant Celebrated in Alandi amid covid restrictions

त्यानुसार आज हनुमान जयंत्ती निमित्त माऊलींच्या मंदिरात फुलमाळांनी सजावट करुन जन्मोत्सव भक्तांविनाच साजरा करण्यात आला  मंदीरात  प्रादुर्भाव सर्वत्र होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये यासाठी देवस्थानकडून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live