आता बुलडाणेकरांच्या सेवेत हापुस आंबा...

संजय जाधव
सोमवार, 3 मे 2021

कोरोनाच्या संकट काळातही बुलढाणा शहरातील नागरिकांना हापुस अंब्याची चव चाखता यावी या मुख्य उद्देशाने बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने ३ हजार पेटया हापुस आंबा बुलढाणा येथे आणण्यात आल्या आहे 

 

बुलढाणा : कोरोनाच्या Corona संकट काळातही बुलढाणा Buldhana शहरातील नागरिकांना हापुस अंब्याची Mango चव चाखता यावी या मुख्य उद्देशाने बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने ३ हजार पेटया हापुस आंबा बुलढाणा येथे आणण्यात आल्या आहे. Hapus mango filing in Buldhana

कोविड 19 Covid च्या सर्व नियमाचे पालन करत योग्य दरात हापुस आंबा उपलब्ध करुण देण्यात आला आहे. बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे चीफ मैनेजिंग डायरेक्टर डॉ.  सुकेश झवर Dr. Sukesh Zaver यांच्या हस्ते हापुस आंबा स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. बुलढाणा शहरातील बुलढाणा प्राइड बिल्डिंग मध्ये हापुस आंब्याचा स्टॉल लावण्यात आला आहे.   

कोकणातील Konkan रत्नागिरी Ratnagiri येथून हा हापुस आंबा आणल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तब्बल १६ वर्षापासून दरवर्षी हापुस आंबा संस्थेच्या वतीने बुलढाणा येथे आणला जात आहे. यावर्षी हापुस आंबा थेट नागरिकांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. Hapus mango filing in Buldhana  

यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबविन्यात मदत होणार आहे त्यासोबाबत रोख रक्कम न देता ऑनलाइन Online Pay पेमेंट करण्याची सोय करण्यात आली आहे. या कोरोनाच्या संकट काळात सुद्धा हापुस आंब्याची चव नागरिकांना चाखता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Edited By- Digambar jadhav

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live