मिठी नदीतून मिळाले सचिन वाझेच्या कृष्णकृत्त्यांचे पुरावे

NIA Found DVR Hard Disk from Mithi River
NIA Found DVR Hard Disk from Mithi River

मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाली आहे. आज एनआयए (NIA) च्या पथकाने मिठी नदीतून सीसीटिव्हीचे डिव्हीआर, एक  हार्डडिस्क व काही नंबर प्लेट शोधून काढल्या आहेत.  Hard Disk DVR Number Plates recovered from Mithi River Disposed by Sachin Waze

या वस्तू वाझेनेच (Sachin Waze) मिठी नदीत पुरावे नष्ट करण्यासाठी टाकल्याचा संशय आहे. आज एनआयचे पथक वाझेला घेऊन मिठी नदीच्या काठावर गेले. स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्याने एनआयएने पाण्यातून या वस्तू बाहेर काढून पंचनामा केला. 

या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन वाझे याने महत्वाचे इलेक्ट्रोनिक पार्ट तोडून ते मिठी नदीच्या (Mithi River) पात्रात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार NIA चे अधिक्षक विक्रम खलाटे यांच्याह चार अधिकारी  सचिन वाझेला घेऊन  दुपारी ३:१५ वा. घटनास्थळी दाखल झाले. मिठी नदीच्या पात्रात सुमारे तीन तास शोध घेण्यात आला. Hard Disk DVR Number Plates recovered from Mithi River Disposed by Sachin Waze

त्यावेळी 2 CPU, 2 DVR, 1 प्रिंटर, 2 हार्डडिक्स, 1 राऊटर आणि 2 नंबरप्लेट नदीत मिळून आल्या.  या इलेक्ट्रानिक वस्तू गुन्ह्यातील  त्या महत्वाचे पुरावे असल्याने त्या तोडून टाकण्यात आल्याचं NIA सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. या वस्तू सचिन वाझे याला दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता वाझेने त्या त्याच्या नसल्याचं सांगितल्याचे कळते आहे. वाझे याच्यावर संगणकाची  डिस्क्स काढून टाकणे, मोबाईल काढून टाकणे आणि या प्रकरणाशी संबंधित इतर पुरावे मिटविण्याचा आरोप आहे. 
Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com