VIDEO | मुंबईतील माथाडी कामगारांच्या कष्टावर डल्ला.

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

.मुंबईतील माथाडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीवर डल्ला मारला गेलाय. बँकेत माथाडी बोर्डाचे बनावट लेटर हेड वापरत तब्बल 5 कोटी रुपये लंपास करण्यात आलेत. माथाडी कामगार म्हंटले की डोळ्यांसमोर येतो कष्टकरी वर्ग.. घाम गाळून रोजीरोटी कमावणारा वर्ग... मुंबई आणि उपनगरात जवळपास 3000 माथाडी कामगार कपडा बाजार आणि दुकानं मंडळाच्या नेतृत्वात काम करतात. या कामगारांच्या पगारातून कापला जाणारा भविष्य निर्वाह निधी आणि वैद्यकीय आकस्मिकता निधीच थेट बँकेमधून लंपास झालाय. साकी नाका इथल्या एका बँकेतून हा निधी परस्पर वळता झालाय.

.मुंबईतील माथाडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीवर डल्ला मारला गेलाय. बँकेत माथाडी बोर्डाचे बनावट लेटर हेड वापरत तब्बल 5 कोटी रुपये लंपास करण्यात आलेत. माथाडी कामगार म्हंटले की डोळ्यांसमोर येतो कष्टकरी वर्ग.. घाम गाळून रोजीरोटी कमावणारा वर्ग... मुंबई आणि उपनगरात जवळपास 3000 माथाडी कामगार कपडा बाजार आणि दुकानं मंडळाच्या नेतृत्वात काम करतात. या कामगारांच्या पगारातून कापला जाणारा भविष्य निर्वाह निधी आणि वैद्यकीय आकस्मिकता निधीच थेट बँकेमधून लंपास झालाय. साकी नाका इथल्या एका बँकेतून हा निधी परस्पर वळता झालाय. मासिक 15000 रुपये पगार असलेल्या या कामगारांना आपले पैसे लंपास झाल्याची खबर लागताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय...

 

 

 

WebTittle:  hard work of mathadi workers in Mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live