पंड्याला 'कॉफी' चांगलीच महागात; जाहिरातीही हातून निसटल्या!

पंड्याला 'कॉफी' चांगलीच महागात; जाहिरातीही हातून निसटल्या!

नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बेताल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या हार्दिक पंड्याला आता आर्थिक आघाडीवरही फटका बसू लागला आहे.

'बीसीसीआय'ने पंड्या आणि के. एल. राहुल यांना तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता जाहिरातदार कंपन्यांनीही दोघांपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. 

पंड्या 'जिलेट' या कंपनीसाठी जाहिराती करतो. मात्र, 'कॉफी विथ करण'मधील वक्तव्यांनंतर 'जिलेट'ने पंड्याबरोबरचा करार संपुष्टात करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात 'जिलेट'ने सांगितले, की पंड्याची विधाने आमच्या कंपनीच्या तत्त्वांच्या विरोधात आहेत. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत आम्ही पंड्याबरोबर कुठलाही करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भारतीय सेलिब्रेटींच्या यादीमध्ये क्रिकेटपटू आघाडीवर आहेत. कर्णधार विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. पंड्या आणि राहुलही काही उत्पादनांच्या जाहिराती करतात. 'जिलेट'चा कित्ता गिरवित आणखीही काही कंपन्या पंड्या आणि राहुलशी करार तोडण्याची दाट शक्‍यता आहे. 

Web Title: Hardik Pandya in trouble after loose comments in koffee with karan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com