१८ वर्षांची हर्षदा मुलाप्रमाणे आई वडिलांच्या व्यवसायात देत आहे साथ

भूषण अहिरे
शनिवार, 29 मे 2021

सध्याच्या युगामध्ये मुलगा मुलगी समान असल्याचा जिवंत दाखला म्हणजे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील हर्षदा विनोद मेतकर.हर्षदा आता बारावी इयत्ता मध्ये शिकत आहे. सध्या कोरोनामुळे सर्व कॉलेज व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने सर्वत्र ब्रेक द चेन अंतर्गत बहुतांश उद्योगधंदे बंद ठेवले आहेत.

धुळे - सध्याच्या युगामध्ये मुलगा मुलगी समान असल्याचा जिवंत दाखला म्हणजे धुळे Dhule  जिल्ह्यातील शिरपूर Shirpur येथील हर्षदा विनोद मेतकर. हर्षदा आता बारावी इयत्ता मध्ये शिकत आहे. सध्या कोरोनामुळे Corona सर्व कॉलेज College व शाळा School बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने सर्वत्र ब्रेक द चेन अंतर्गत बहुतांश उद्योगधंदे  business बंद ठेवले आहेत. Harshada is supporting her parents in her business

त्यामुळे बहुतांश नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशीच काहीशी परिस्थिती हर्षदाच्या घरावर देखील ओढावली आहे.परंतु अशा संकट काळामध्ये मुलाप्रमाणे हर्षदा आईच्या फळविक्रीच्या व्यवसायात व वडिलांच्या रिक्षा व्यवसायात खंबीरपणे साथ देत आहे.

हर्षदाचे वडील रिक्षा चालवतात व घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे आई फळ विकून मिळविलेल्या पैशांमध्ये घर चालवते. तर मोठा भाऊ दुसऱ्यांच्या हाताखाली मोलमजुरी करतो.घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आईच्या व वडिलांच्या खांद्याला खांदा लावून हर्षदा देखील मागे न राहता वडिलांच्या रिक्षा व्यवसायात तसेच आईच्या फळ विक्रीच्या व्यवसाय मध्ये मोठा हातभार लावते आहे.Harshada is supporting her parents in her business

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, 7 जणांचा मृत्यू 

परिचयातील लोकांना तसेच ओळखीच्या व्यक्तींना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी किंवा आणखी कुणाला इमर्जन्सी सेवा देण्यासाठी हर्षदा स्वतः रिक्षा घेऊन त्यांच्या मदतीला पोहचते.हर्षदा दिवसभरातून रिक्षा चालवून वडिलांना हातभार लागेल इतकी कमाई आणून देते.वडील त्या वेळेत फळ विक्रीचा धंदा सांभाळतात मग आई घरकाम संभाळते. रिक्षा घरी लावल्यानंतर हर्षदा फळ विक्रीचा  धंदा देखील संभाळते.

यामुळे हर्षदाच्या आई-वडिलांना मुलाप्रमाणेच हर्षदाचा मोठा आधार मिळत आहे. हर्षदाला पुढे चालून पायलट बनायचे आहे. हर्षदाची जिद्द व चिकाटी बघून ती पुढे चालून भविष्यात पायलट देखील बनेल यात काहीच शंकाच नाही.

Edited By - Shivani Tichkule

 हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live