अखेर राहुल गांधींना पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास परवानगी, तर मीडियासमोर कुटुंबियांनी सांगितलं भयाण वास्तव

साम टीव्ही
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020
  • राहुल गांधी पीडितांच्या भेटीसाठी हाथरसकडे रवाना
  • यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांचा फौजफाटा
  • राहुल गांधींसोबत प्रियांका गांधीही हाथरसकडे रवाना
  • आताची सर्वात मोठी बातमी

काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसकडे रवाना झालेत. पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दिल्लीमधून रवाना झालेत. हाथरसमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणी योगी सरकार राजकारण करतंय असा आरोप राहुल गांधींनी केलाय. आता राहुल गांधी, प्रियांका गांधींसह पाच जणांना हाथरसमध्ये जाण्यास उत्तर प्रदेश सरकारने परवानगी दिलीय. मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

सामूहिक बलात्कारांची घटना घडल्यानंतर पोलिसांनी कैदेत ठेवलेल्या हाथरस गावात अखेर आज माध्यमांना जाण्यास परवानगी मिळाली. वृत्त प्रतिनिधी पीडित कुटुंबाच्या घरात पोहोचताच, नातलगांच्या अश्रूंचा बांध फुटला. आणि त्यांनी थेट कॅमेऱ्यासमोर येत, मुर्दाड प्रशासनाचा काळा चिठ्ठाचं वाचून दाखवला. जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांनी धमकावल्याचा व्हिडीओ खरा असून, आम्हाला यूपी पोलिसांवर विश्वासच नसल्याची टीका पीडितेच्या कुटुंबीयांनी केलीय. याशिवाय गावातील काही लोकांकडून आमच्या जीवाला धोका असल्याची भीती देखील त्यांनी बोलून दाखवली. आम्ही  प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याचादेखील आरोप, त्यांनी केला.

आता राहुल गांधी पिडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेलेत, दरम्यान आता नेमकं आणखी काय सत्य समोर येतं आणि या भयंकर घटनेमागे नेमकं कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत तेच पाहणं महत्वाचं असणार आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live