यंदाचा उन्हाळा घरात काढावा लागणार?

साम टीव्ही
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

पुन्हा लॉकडाऊन लागणार का? हाच प्रश्न सध्या प्रत्येकजण विचारतोय. पण त्याचं उत्तर इतर कुठेही न शोधता, स्वत:मध्येच शोधायला हवं. कारण, वाढणारी गर्दी, मास्क न लावता फिरणं हेच कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे 

पुन्हा लॉकडाऊन लागणार का? हाच प्रश्न सध्या प्रत्येकजण विचारतोय. पण त्याचं उत्तर इतर कुठेही न शोधता, स्वत:मध्येच शोधायला हवं. कारण, वाढणारी गर्दी, मास्क न लावता फिरणं हेच कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे, लॉकडाऊन पुन्हा लागण्याला आपण स्वत:च जबाबदार ठरणार नाही, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचे आकडे पुन्हा वाढू लागलेयत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढू लागलेयत.

महाराष्ट्रात २४ तासांमध्ये राज्यात सहा हजार ९७१ करोनाबाधित वाढले असून, महाराष्ट्रात 24 तासांत ३५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५२ हजार ९५६ वर पोहोचलीय. महाराष्ट्रात आतापर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचलीय.

कोरोनाग्रस्तांचे वाढणाऱ्या आकड्यांमुळे महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळेच, शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झालीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाऊन लावायचा की नाही हे जनतेनंच ठरवावं, आणि कोरोनाबाबतच्या नियमांच काटेकोर पालन करण्याचं आवाहान करत, आठ दिवसांचा अल्टिमेटमही दिलाय.

कोरोनाबाबत ही सगळी गंभीर परिस्थिती असूनही, अनेकजण मास्क न लावता फिरतायत, तर अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून येतंय. ही अशी बेफिकीरी यापुढेही अशीच सुरू राहिली तर, कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत राहतील. आणि तो अनेकांच्या जीवाशी खेळ ठरेल. कोरोनाच्या पुन्हा सुरू झालेल्या थैमानाला जर गांभीर्यानं घेतलं नाही तर, पुन्हा लॉकडाऊनचा कटू निर्णय घेण्याशिवाय पर्यात उरणार नाही. आणि महाराष्ट्राला यंदाचा उन्हाळ्यातही लॉकडाऊनचे चटके सासावे लागतील. सुमारे वर्षभर कोरोनाच्या संकटात होरपळूनही काहीजणांना शहाणपण आलं नसेल तर, पुन्हा लॉकडाऊनचे साखळदंड प्रत्येकाच्या पायात अडकतील, हे कुणीच विसरता कामा नये.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live