PMC बॅक ग्राहकांना धक्का, PMC बॅक 6 महिने राहणार ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मुंबई : आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत.

मुंबई : आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर  बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी खातेदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.  
"आरबीआय"ने पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेवर कलम 35 ए अंतर्गत "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली आहे. 23 सप्टेंबर पासून निर्बंध लागू झाल्याची अधिसूचना आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे बँकेच्या खातेदारांना 'आरबीआय'च्या निर्देशानुसार बँक खात्यातून मर्यादित रक्कम काढता येते. अनियमितता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील सहा महिन्यात त्यात यश येईल असे थॉमस यांनी म्हटले आहे.

Web Title: ​Have you been eating at the PMC bank?


  


संबंधित बातम्या

Saam TV Live