तुम्हाला बोनस मिळाल्याचा मेसेज आलाय? सावधान! मेसेजमधली लिंक ओपन केली तर होईल घात

साम टिव्ही
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

 

  • तुम्हाला बोनस मिळाल्याचा मेसेज आलाय?, सावधान
  • मेसेजमधली लिंक ओपन केली तर होईल घात
  • बोनसचा मेसेज मोबाईलवर, हल्ला होणार अकाऊंटवर

आता बातमी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची.  दिवाळीत अनेकांना बोनसचे वेध लागतात.  त्याचाच गैरफायदा घेत अनेक हॅकर्स लोकांची लूट करतायत. मोबाईलवर बोनसचा मेसेज पाठवून कशी होतेय ही लूट. पाहूयात.

 सध्या दिवाळीच्या सणाची धामधूम सुरूय.  अनेकांना बोनसचे वेध लागलेयत.  पण हीच बोनसची आशा तुमचा घात करू शकते.  कारण अनेकांना बोनस मिळाल्याचे मेसेज आलेयत. 

अशा मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाऊंटची माहिती, पासवर्ड, ओटीपी हॅक होऊ शकतात. आणि हे हॅकर तुमच्या अकाऊंटमधील पैशांवर डल्ला मारू शकतात.  त्यामुळे अशा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून नका आणि असे मेसेज लागलीच डीलीट करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावलीय. जे काही वाचवलेले पैसे आहेत, त्यावरच दिवाळीची बेगमी केली जातेय. मात्र असे मेसेज तुम्हाला आले तर तुम्ही सावध व्हायला हवंच, पण त्याचसोबत लोकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या हॅकर्सच्या मुसक्या पोलिसांनी वेळी आवळायला हव्यात.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live