VIDEO| पाहिलात का पांढऱ्या दुधाचा काळाधंदा?

वैदेही काणेकर, साम टीव्ही मुंबई 
शनिवार, 11 जानेवारी 2020

दूध आरोग्यासाठी केव्हाही चांगलंच... याबद्दल शंका नाही... मात्र ही दृश्य, तुमचा हा समज बदलून टाकतील... इथे या छोट्याशा खोलीत तुमच्या जीवाशी खेळ सुरु आहे... तुम्ही तब्येत बनवण्यासाठी जे दूध पिताय... तेच दूध तुमच्या तब्येतीचे तीन-तेरा वाजवेल... कारण...  ... दुधाच्या पिशव्या फोडून ही टोळी त्यात दूषित पाणी भरतीए.... 

तुम्ही ज्या मोठ मोठ कंपन्यांवर विश्वास ठेवून दूध खरेदी करता... त्याच कंपन्यांचं हे दूध आहे...अमोल गोल्ड आणि अमोल ताजा कंपनीच्या पिशव्या कात्रीनं कापून ही टोळी त्यात विषारी दूध भरतेय... हा सगळा प्रकार सुरु होता मुंबईच्या गोरगावात.... जिथे मुंबई पोलिसांनी छापा टाकलाय... 

 या एका कारवाईत पोलिसांनी 139 लिटर विषारी दूध जप्त केलंय... पण यानिमित्ताने मुंबईकरांपुढे असलेला विषारी दूधाचा धोका समोर आलाय... चार जणांची ही टोळी गडाआड गेली असली.. तरी आणखी अशा किती टोळ्या मुंबईकरांच्या जिवाशी खेळत असतील कुणास ठाऊक.. सगळीकडे पोलिस पोहोचू शकत नाहीत.. त्यामुळे दूध घेताना तुम्हीच दूधाची पिशवी तपासून पाहा... 

संबंधित बातम्या

Saam TV Live