चिनी बियाण्यांच्या पार्सलमध्ये घातक रसायनं, शेती, पिकांसह झाडांचाही घेतायत जीव

साम टीव्ही
रविवार, 9 ऑगस्ट 2020
  • शेतकऱ्यांनो सावधान, चीनकडून आता सीड टेररिझम
  • चिनी बियाण्यांच्या पार्सलमध्ये घातक रसायनं
  • शेती, पिकांसह झाडांचाही घेतायत जीव

आता बातमी शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या नव्या संकटाची. कोरोनाचं संकट जगभरात पोहोचवणारा चीन आता शेतकऱ्यांना मुळावर उठलाय. चीनमधून आलेलं बियाणं जमीन, पिकांसह झाडांचंही नुकसान करतंय. कसं, ते पाहूयात या रिपोर्टमधून.

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाशी झुंज चालू असतानाच चीननं आणखी एक भयानक कपट सुरू केलंय. हे कपट इतकं भयानक आहे, की जगाचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याच्या मुळावर उठलंय. चीन भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये बियाण्यांच्या नावाखाली विष पेरू लागलाय. चीननं पाठवलेल्या बियाण्यांच्या पार्सलमध्ये घातक रसायनं आहेत, जी शेतीसह जैवविविधतेला धोकादायक आहेत. भारत सरकारने शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्यायत.
चीननं अनेक देशांमध्ये बियाण्यांच्या पार्सलमधून घातक रसायनं पाठवले आहेत. या घातक रसायनांमुळे जमिनीचा पोत, पिकं आणि इतर झाडं यांना मोठं नुकसान होतंय. त्याचसोबत, या रसायनांमुळे मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली गेलीय.

सर्व राज्यांचे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, बियाणे संघटना, बियाणे प्रमाणपत्र संस्था, बियाणे कॉर्पोरेशन आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेला अशा पार्सलपासून सावध राहण्याचा सल्ला कृषी मंत्रालयाने दिला आहे.

चीननं आधीच कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगाला ढकललंय, त्यात आता सीड टेररिझम म्हणजे बियाण्यांचा दहशतवाद चीननं सुरू केलाय. त्यामुळे, भारतासह जगभरातील शेतकऱ्यांनी सावध राहायला हवं. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा मुद्दा उचलून चीनचं कपट हाणून पाडायला हवं.


संबंधित बातम्या

Saam TV Live