मिझोरम : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचे निधन 

chana mizoram.jpg
chana mizoram.jpg

आयझॉल : “जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे” The largest family in the world कुलपिता म्हणजेच कुटुंबप्रमुख Head of the family म्हणून ओळखले जाणारे  झिओन-अ- चाना Zion-a-chana यांचे रविवारी मिझोरमची Mizoram राजधानी आयझॉल Aizawl याठिकाणी निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. चाना यांना 38 बायका (पत्नी) 89 मुले  आणि 36 नातवंडे आहेत.  त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांच्या बक्तावंग तेलंगणम या मूळ गावापासून 60 किलोमीटर दूर असलेल्या आयझॉल Aizawl याठिकाणी  एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. (The head of the world's largest family has passed away) 

चाना यांच्या निधनानंतर मिझोरमचे मुख्यमंत्री  झोरमथंगा यांनी ट्वीट करत याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. 38 बायका आणि 89 मुले असलेले मिझोरमचे झिओन-अ चाना Zion-a-chana यांना काल अखेरचा निरोप देण्यात आला. जगातील सर्वात मोठे कुटुंब म्हणून चाना यांच्या कुटुंबाची ओळख होती. त्यांच्या याच ओळखीमुळे मिझोरमचे त्यांचे बक्तावंग तेलंगणम ही गांव पर्यटनाचे एक ठिकाण बनले होते.  असे ट्विट करत झोरमथंगा यांनी चाना यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  तसेच शेवटी, रेस्ट इन पीस सर! ”असेही म्हटले आहे. 

चाना आणि त्यांचे कुटुंब ‘चुआन थार रन’म्हणजेच न्यू जनरेशन होम नावाच्या चार मजल्यांच्या घरात राहत होते.  गेल्या अनेक वर्षांपासून ते एक पर्यटनाचे  आकर्षण केंद्र बनले होते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही  त्यांच्या या मोठ्या कुटुंबाची दखल घेतली होती.

1942 मध्ये चाना यांच्या आजोबांनी  खुआंगतुहा यांनी  चाना पावळ किंवा चुआंथर या नावाने बहुविवाह पंथाची स्थापना केली. चानाने हा पंथ वाढवला. आता या पंथात त्यांचे सुमारे 2000 अनुयायी आहेत. हे सर्वजण एकत्र  राहतात आणि घरासाठी स्वयंपूर्ण युनिटमध्ये काम करतात. आता सुमारे 400 कुटुंबे या पंथचा भाग आहेत. तथापी, चाना यांनी केवळ चुआन थार रनचा तळ मजला पर्यटकांसाठी खुला केला आहे. वरच्या मजल्यावर कोणत्याही पर्यटकाला  जण्याची परवानगी मिळत नाही. 

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com