Health Tips : आवळा रसाचे हे अद्भुत परिणाम तुम्हाला माहित आहे का ?

amla juice
amla juice

Health Tips - आवळामध्ये आरोग्यास आवश्यक असलेले खनिजे आणि पोषकतत्वे असतात. तसेच यामुळे अनेक आजारांपासून बचाव देखील होतो. आवळ्याचे सेवन अनेक मार्गाने करता येते. जसे की , लोणचे, ज्यूस किंवा जॅम तयार करून सेवन करू शकतो. आवळा आपल्याला प्रत्येक रूपात लाभदायी ठरतो. जाणून घेऊया आवळा रसाचे हे अद्भुत परिणाम  Do you know this wonderful effect of amla juice?

आवळामध्ये जीवनसत्व 'सी' मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती वाढविण्यास मदत करते. आवळा सर्दी, खोकला या आजारापासून दूर ठेवतो. तसेच शरीरातील विषाणू आणि विषाणूजन्य संसर्गापासून दूर ठेवते. आयुर्वेदात देखील आवळ्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे. 

हे देखील पहा - 

- आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने खोकला, फ्लू  आणि तोंडाच्या अल्सरवर लाभदायक आहे. नियमितपणे दोन चमच आवळा रस आणि दोन चमच मध यांचे मिश्रण प्यायल्याने सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते. तसेच आवळा रस प्यायल्याने स्त्रियांच्या पाळीची समस्या कमी करण्यास मदत करते. 

- आवळा रस प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येण्यास मदत मिळते.  तसेच त्वचेचे आजार असल्यास दूर होतात. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग , मरूम कमी होतात. 

- ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे. त्यांच्याकरीता आवळा रस लाभदायी आहे. तसेच मुतखाड्याचा त्रास देखील कमी होतो. 

- आवळा रस प्यायल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. आवळ्यात असलेल्या अमिनो असिड आणि प्रोटिन केसांसाठी उपयुक्त ठरतात. केसांची कळती कमी होते. 

- आवळा रसाचा न्यूट्रीशन ड्रिंक म्हणून वापर केला जातो. कारण यामध्ये जीवनसत्व 'सी' , लोह इत्यादीचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. 

- आवळा रस प्यायल्याने शरीरातील रक्तशुद्धीकरण आणि रक्ताभिसारण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते. 

- ज्या लोकांना दमा या आजाराचा त्रास होतो, त्यांना आवळा रस लाभदायी ठरतो. तसेच मधुमेह असलेल्या लोकांना देखील नियंत्रण ठेवता येते. त्यासोबतच यकृत स्वस्थ राहून पचनशक्ती सुरळीत काम करते. 

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com