आरोग्य कर्मचाऱ्याने ICU बेड मिळून देण्यासाठी घेतले 1 लाख 80 हजार

मंगेश गाडे
मंगळवार, 18 मे 2021

जुन्नर तालुक्यातील आळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडीकल फार्मासिस्ट अमोल पवार हा सरकारी कर्मचारी असून रूग्णांना बेड उपलब्ध करण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचे समोर आले आहे.

जुन्नर : जुन्नर Junnar तालुक्यातील आळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील Primary Health Center मेडीकल फार्मासिस्ट Medical Pharmacist अमोल पवार हा सरकारी कर्मचारी Government Servant असून रूग्णांना बेड Bed उपलब्ध करण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचे समोर आले आहे.

नाशिकच्या Nashik सिन्नर Sinnar येथील एकाच कुटुंबातील दोन भाऊ व आई कोविडने Covid ग्रस्त Patient असताना त्यांच्या आळे येथील नातेवाईकांच्या माध्यमातून आळेफाटा येथे बेड मिळेल या आशेने त्यांनी संपर्क सुरू केला असता अमोल पवार याने 1 लाख 80 हजार रूपये द्या बेड मिळवून देतो असे सांगून पैशाची मागणी केली

हे देखील पहा -

घरातल्या चार पेशंटला बेड मिळणे त्यांच्यासाठी महत्वाचे होते दुसरा पर्याय नव्हता म्हणून तात्काळ कुटूंबीयांनी ऑनलाईन पैसे अमोल पवार याच्या खात्यावर जमा केले.पिंपरी चिंचवडच्या सरकारी न्यू भोसरी हॉस्पिटल येथे  ICU बेड उपलब्ध करून पवारने रुग्णाला ऍडमिट केले. त्यातील 3 रूग्ण उपचारा दरम्यान दगावले.

यात फिर्यादी सचिन इंगळेची आई व दोन भाऊ यांचा समावेश आहे. एकीकडे जनता या करोनाच्या अत्यंत वाईट काळात सरकार कडून मदतीची अपेक्षा करत असताना असे सरकारी कर्मचारी मात्र रुग्णांच्या कुटुंबाच्या अडचणीचा फायदा घेऊन स्वतःचे खिसे भरत आहेत. 

PUBG मोबाइल इंडियाची पूर्व नोंदणी आजपासून सुरु: बक्षिसे, नकाशे आणि बरेच काही.. 

आळे येथील आरोग्य कर्मचारी अमोल पवार याने आपला गुन्हा कबूल केला असून त्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा Case दाखल झाला आहे,यात त्याला बेड मिळून देण्यासाठी  कोणती साखळी कार्यरत आहे का याचा पोलीस Police तपास घेत आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live