शिर्डी-इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची आज सुनावणी

Indurikar Maharaj
Indurikar Maharaj

शिर्डी : पुत्र प्राप्ती संदर्भात केलेल्या विधानामुळे अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या प्रकरणाच्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वादग्रस्त विधानानंतर इंदुरीकर(Indurikar Maharaj) महाराजांच्या विरोधात संगमनेरच्या न्यायालया मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.  Hearing of Indurikar Maharaj Case today in Nagar Court

इंदुरीकर महाराजांना हजर राहण्याचे आदेश दिले होते,  मात्र या आदेशाला आव्हान देत इंदुरीकर महाराजांनी संगमनेर जिल्हा अतिरिक्त न्यायालय मध्ये याचिका दाखल केली होती. आज या प्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराज यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार हे आज कळणार आहे.....

गेल्या वर्षी फेब्रुवारी (February) महिन्यामध्ये वादग्रस्त वक्तव्याचा विडिओ समोर आला होता. त्या नंतर अंधश्रद्धा निर्मूलनच्या रंजना गवांदे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे याची तक्रार केली होती.पी.सी.पी.एन.डी.टी.(PCPNDT) ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा आणि यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने हा व्हिडीओ या जिल्ह्यातला नाही, असं कारण देत इंदुरीकर महाराजांवरची कारवाई टाळली होती. पुढे रंजना गवांदे यांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली . 26 जून रोजी इंदुरीकर महाराजांच्या विरोधामध्ये संगमनेर न्यायालय मध्ये गुन्हा दाखल झाला, आणि महाराजांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.Hearing of Indurikar Maharaj Case today in Nagar Court

मात्र इंदुरीकर महाराजांनी जिल्हा न्यायालय मध्ये धाव घेऊन हजर राहण्याचे आदेशाला स्थगिती मिळवली होती. गेल्या सात महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन नी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन व सरकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडली आहे.  आज याचा निकाल अपेक्षित आहे, त्यामुळे इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळतोय की त्यांच्या अडचणीत वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By-Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com