हृदयद्रावक! हंडाभर पाण्यासाठी चिमुकल्याचा अंत, आता तरी प्रशासन जागं होईल का?

साम टीव्ही
मंगळवार, 16 मार्च 2021

हंडाभर पाण्यासाठी मुलाचा जीव गेला
विहिरीत पाय घसरुन मुलाचा मृत्यू
घोटभर पाण्यासाठी जीव पणाला

 

 

 

उन्हाळ्याची चाहुल लागताच ग्रामीण महाराष्ट्राला पाणीटंचाईचे चटके बसू लागलेत. हिंगोलीत पाणी भरण्यासाठी गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय.

VIDEO | अरेरे! असले उपद्व्याप नका करु...क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला आणि ती खिडकीत अडकली https://www.saamtv.com/oops-dont-bother-attempt-escape-quarantine-center-failed-and-she-got-stuck-window-11820

हिंगोलीच्या माळ हिवरा गावातली ही विहीर. या विहिरीत बुडून राहुल भोसले या मुलाचा मृत्यू झालाय. माळहिवरा गावात पाण्याची टंचाई आहे. पाणी आणण्यासाठी राहुल सकाळी आठ वाजता दोन किलोमीटर अंतरावरच्या विहिरीवर गेला होता. पाणी भरण्याच्या प्रयत्नात पाय घसरुन तो विहिरीत पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

 पाण्यासाठी सामान्यांचा जीव पणाला लावावा लागतो. दरवर्षी पाणीयोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. तरीही राहुलसारख्या अनेकांचा हंडाभर पाण्यासाठी जीव जातो हे खेदजनक आहे.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live