राहण्यासाठी सगळ्यात भारी, आपला महाराष्ट्र लयभारी

साम टीव्ही
शनिवार, 6 मार्च 2021

महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी ही बातमी आहे. कारण, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या, सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 12 शहरांचा समावेश झालाय  पुणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेलाय

महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी ही बातमी आहे. कारण, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या, सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 12 शहरांचा समावेश झालाय  पुणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेलाय

(ऐका हो ऐका  लक्ष देऊन ऐका राहण्यासाठी सगळ्यात भारी  पुणे, नवी मुंबई आणि मुंबई लयभारी ) (तुतारीच्या आवाजाने सुरूवात करावी) या दवंडीमुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावलीय... कारण, राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी केंद्रानं जाहीर केलीय, आणि त्यात आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या पुण्यानं देशात दुसरा नंबर पटकावलाय. इतकंच नाही तर सुंदर नवी मुंबईनं देशात सहाव्या नंबरवर झेप मारलीय. महाराष्ट्रासह देशाचं हृदय असणारी मुंबईही देशभरात दस नंबरी ठरलीय.

केंद्र सरकारने राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केलीय. त्यात बंगळुरूनं पहिला तर आपल्या पुण्यानं दुसरा क्रमांक पटकावलाय. त्याचसोबत अहमदाबादनं तिसऱ्या, चेन्नईनं चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय. राहण्यासाठी उत्तम शहरांत सुरत पाचव्या तर नवी मंबई सहाव्या क्रमांकावर आहे. उत्कृष्ट शहरांमध्ये सातव्या क्रमांकावर कोयंबतूर, आठव्या क्रमांकावर बडोदा शहराने बाजी मारलीय. त्याचसोबत, इंदूरनं नवव्या क्रमांकवर झेप घेतलीय आणि आपली लाडकी मुंबई दस नंबरी ठरलीय.

देशभरातील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तीन शहरं टॉप टेन शहरांमध्ये विराजमान झालीयत. महत्त्वाचं म्हणजे, आपल्या महाराष्ट्रातील तब्बल 12 शहरांचा देशातील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत समावेश झालाय. फक्त महाराष्ट्राच विचार केला तर

देशभरात उत्कृष्ट शहरांत ठाण्याला 11वा क्रमांक मिळालाय. तर, कल्याण-डोंबिवलीनं देशात 12वा क्रमांक पटकावलाय. त्याचप्रमाणे, पिंपरी-चिंचवडचा 16 वा, सोलापूरचा 17वा क्रमांक आलाय. तसेच, नागपूरनं 25 व्या, औरंगाबादनं 34 व्या क्रमांकावर झेप घेतलीय. तर, नाशिक 38, वसई-विरार 39 वा क्रमांक मिळालाय.
 

पुणे, नवी मुंबई आणि नवी मुंबई ही शहर महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी कायमच आकर्षणाची केंद्र असतात. पोटा-पाण्यासाठी, शिक्षणासाठी या शहरांमध्ये अनेकजण येत असतात. याच शहरांमध्ये आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं... याच स्वप्ननगरींना आता देशातील सर्वोत्कृष्ट शहरांचं कोंदण लागलंय. म्हणूनच, अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र देशापुढे आदर्श ठेवत असतो, आता सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत मानाचं पान मिळाल्याने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे, सगळ्यात भारी आपला महाराष्ट्र लयभारी.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live