‘हाउडी मोदी’वर पावसाचे सावट

‘हाउडी मोदी’वर पावसाचे सावट

ह्युस्टन: मोदी यांच्या या 'हाउडी मोदी' सभेविषयी उत्कंठा असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी ५० हजारांपेक्षा जास्त अमेरिकन-भारतीय उपस्थित राहणार आहेत. ही सभा दोन दिवसांवर आली असतानाच, आयोजकांसमोर पावसाचे आव्हान उभे राहिले आहे. टेक्सासच्या उष्णकटीबंधीय परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि गुरुवारी वादळी वाराचा तडाखा बसला. काही भागांना या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. फोर्ट बेंड, हॅरिस, गॅल्वेस्टोनसारख्या परगण्यांमध्ये प्रतितास दोन ते तीन इंच इतका पाऊस पडला. या पावसामुळे सर्वत्र पूर आला असून, वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अनेक ठिकाणांहून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढावे लागले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी घरातच राहावे, अशी सूचना प्रशासनाने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील ह्युस्टन येथील सभेची जोरदार तयारी सुरू असतानाच, तेथे वादळी पावसाचे आव्हान उभे ठाकले आहे. या पावसामुळे ह्युस्टनसह टेक्सासच्या दक्षिण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने १३ परगण्यांमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या स्वयंसेवकांनी मात्र सभा यशस्वी करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. या कार्यक्रमासाठी १५०० स्वयंसेवक काम करत आहेत. हे स्वयंसेवक २४ तास काम करत असून, रविवारी होणारा कार्यक्रम यशस्वी करूनच दाखवू, असे आयोजकांनी म्हटले आहे.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी १३ परगण्यांमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. 'ही परिस्थिती अचानक उद्भवली असून, या दिवसांमध्ये झालेल्या या बदलांमुळे हवामानातील बदलाचे वास्तव समोर आले आहे. फक्त चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक संकटांनाच सामोरे जाण्याची परिस्थिती आता उरली नाही, तर अशा पद्धतीने अचानक येणारी वादळे किंवा पावसालाही आपल्याला तोंड द्यावे लागेल,' असे अबॉट यांनी म्हटले आहे.

Web Title heavy rains in houston ahead of pms howdy modi
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com