पत्रकार आणि पोलीसांच्या सहकार्याने तब्बल सहा महिन्यानंतर अभिषेकला भेटली त्याची आई !

With the help of journalists and police Abhishek meets his mother after six months
With the help of journalists and police Abhishek meets his mother after six months

बुलढाणा : अभिषेकला, पत्रकार आणि पोलीसांच्या सहकार्याने तब्बल सहा महिन्यानंतर Six months त्याची आई मिळाली आहे. बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील मलकापूर Malkapur शहरात सद्यस्थितीत कडक लाॅकडाऊन सुरू आहे. संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यातच सायंकाळी सहा वाजेदरम्यान पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर शहर पोलिस स्टेशन कडे जात असतांना तहसील चौकात अंदाजे पंचेचाळीस वर्षीय मनोरुग्ण महिला हातात दोन बॅगा घेऊन भटकतांना दिसली. अधिक विचारपूस करत आधारकार्ड वरील पत्त्यावरून पोलीस त्यांच्या घरी गेले, आणि मुलाशी संपर्क साधून ही अनोखी आई आणि मुलाची भेट घडवून आणली.  With the help of journalists and police Abhishek meets his mother after six months

मलकापूर शहरांमध्ये दोन दिवसापासुनच बेवारस पने फिरत असलेल्या  या महिले बाबत पत्रकार बांधवांनी शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनाही भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. पोलीस निरीक्षक काटकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत परीस्थितीचा आढावा घेतला. गजानन ठोसर यांनी अनाथांचे कैवारी, सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड ता.चिखली येथील डॉ.नंदकिशोर पालवे यांच्याशी संपर्क साधला व महिलेविषयी संपूर्ण माहिती दिली असता, डॉ.पालवे हे ॲम्बुलन्स द्वारे मलकापुर येथे येऊन शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, गजानन ठोसर सह पत्रकार व पोलीसांच्या मदतीने त्या महिलेस पळसखेड येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानात आणले.

हे देखील पहा -

त्या महिलेच्या  आधारकार्ड वरील पत्त्यावरून ब्रम्हपुरी जि‌. चंद्रपुर Chandrapur पोलीस स्टेशनशी ठोसर यांनी संपर्क साधला. ठाणे अंमलदार रामटेके यांना सदर महीलेची मिसिंग तक्रार वैगेरे दाखल आहे का ? याबाबत विचारणा केली मात्र रामटेके यांनी सदर महीलेबाबत मिसिंग दाखल नसून सहकार्य दाखवित त्या महीलेच्या आधारकार्ड वरील पत्त्यावर घरी जाऊन तिचा भाऊ सुरेश वंजारी यांचेशी भ्रमणध्वनीवर बोलणे करुन दिले. नंतर सुरेश वंजारी यांनी ही माहिती भोपाळ येथील मोठे बंधु नरेश वंजारी, त्या महीलेचा वापी (गुजरात) Gujrat येथील मुलगा अभिषेक याला माहिती दिली. 

अभिषेक याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून आई सहा महिन्यापासून मी तुझी वाट पाहत आहे. तु भेटावी म्हणुन दररोज देवाला अगरबत्ती सुद्धा लावीत आहे. आई तु आता मला मिळाली असून उद्या तुला घेण्यासाठी मी मलकापूर येथे येत असल्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी सांगितले. मुलाशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संभाषणाचे तेज तिच्या चेहऱ्यावर उमटले. With the help of journalists and police Abhishek meets his mother after six months

आईला घेण्यासाठी अभिषेकहा त्याच्या मामा नरेश वंजारी सह मलकापूर Malkapur शहर पोलीस स्टेशन येथे दाखल झाला. मलकापूर येथून पत्रकार गजानन ठोसर,शहराध्यक्ष  विरसिंहदादा राजपूत, पत्रकार गौरव खरे, समाधान सुरवाडे,राजेश इंगळे आदींनी वंजारी परिवार सोबत  पळसखेड (चिखली) येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान गाठले अभिषेकला त्याची आई मिळवून दिली. यावेळी अभिषेकने आईला मिठी मारली तब्बल सहा महिन्यानंतर मायलेकांची अनपेक्षित भेट झाल्याने दोघांचेही अश्रु अनावर झाले होते.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com