नाका कामगार आणि घरकाम करणााऱ्या महिलांना शिवसेने कडून मदतीचा हात..

helping hand
helping hand

कल्याण : कोरोना Corona रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीसह Curfew लॉकडाऊन Lockdown सुरु आहे. त्यामुळे नाका कामगार आणि घरकाम करणााऱ्या महिलांना काम उपलब्ध नाही. त्यात लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. अशा कठीण  परिस्थितीत शिवसेना Shiv Sena नगरसेवक महेश गायकवाड Mahesh Gaikwad आणि कल्याण Kalyan पूर्वेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाका कामगार आणि घरकाम करणााऱ्या महिलांना मदतीचा हात दिला आहे. जवळपास दीड हजार कुटुंबांना अन्नधान्याचे किट आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.  Helping hand from Shiv Sena corporator 

लॉकडाऊनच्या काळात भाजपकडून BJP राजकारण केले जात आहे.  मात्र शिवसेना हा पक्ष रस्त्यावर उतरून काम करणारा पक्ष आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिकवण दिली आहे की, संकट काळात जनतेला त्रास न होता, त्यांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. नागरीकांचा जीव वाचविण्यासाठी माझा जीव धोक्यात आला तरी मी जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरून काम करणार आहे.  जनतेच्या मदतीला सातत्याने धावून जाणार आहे असा निर्धार या अन्नधान्य कीट वाटप प्रसंगी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे.

हे देखील पहा -

नगरसेवक गायकवाड हे गेल्या वर्षभरापासून कोरोना काळात जनतेच्या मदतीसाठी तत्पर राहिले आहेत. अन्नधान्य, भाजीपाला, मास्क, सॅनिटायझर आदीचे वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नाका कामगार, वीटभट्टी कामगार, परप्रांतीय, मोलकरणी आदींना मदतीचा हात दिला आहे. Helping hand from Shiv Sena corporator 

इतकेच नव्हे तर जून महिन्यात वादळी तडाख्यात ज्यांच्या घरांचे नुकसान झाले अश्या नागरिकांना घर बांधण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत  देखील त्यांनी केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी खाजगी रुग्णालयांकडून Private Hospitals कोरोना रुग्णांची आर्थिक लूट केली जात होती, त्या विरोधात संबंधित खाजगी रुग्णालयात जाऊन त्यांनी रुग्णांसाठी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरत अनेकांची बिले कमी करुन दिली आहेत. 

Edited By - Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com