लॉकडाऊन मध्ये तृतीयपंथीयांना मदतीचा हात, किन्नर माँ संस्थे तर्फे जीवनावश्यक वस्तूचे वाटप

kinnar vatap
kinnar vatap

मुंबई - कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यात सध्या संचारबंदी Curfew सुरू आहे कडक निर्बंधांमुळे छोट्या व्यावसायिकांसह श्रमिक, कष्टकरी वर्गाची रोजीरोटी बुडाली आहे. त्यातच समाजाने काही अंशी अजूनही स्वीकार न केलेल्या तृतीयपंथी hird gender यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. A helping hand to third gender in lockdown

मात्र या कठीण वेळेत मुंबईतील Mumbai किन्नर माँ संस्थेचे तृतीयपंथी यांच्या  पाठीशी भक्कम उभे राहून घरोघरी जाऊन अन्नधान्याचे वाटप Allocation केले. निर्बंधांमुळे तृतीयपंथी यांची दिनचर्या थांबली दिवसाला एक रुपयाची कमाई होत नाही दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न त्यांना सध्या भेडसावत आहे मात्र अशा गरजवंतासाठी किन्नर माँ  ही संस्था देवदूत ठरली आहे.

हे देखील पहा -

गेल्या सात वर्षांपासून ही संस्था तृतीयपंथी समाजाकरिता जोमाने काम करत आहे संस्थेतर्फे मुंबईसह पालघर ठाणे वसई पुणे परिसरातील बस स्टॅन्ड झोपडपट्टी परिसरात 80 हजार पेक्षा जास्त तृतीयपंथी गरीब गरजू नागरिकांना शिधावाटप वाटप, मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे. A helping hand to third gender in lockdown

या कोरोना महामारीत जात धर्म न मानता आम्ही माणुसकी धर्म पाळून मदत करीत आहोत.मात्र आमचे प्रश्न सरकारने सोडवणे गरजेचे आहे.असे ही किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलमा खान यांनी सांगितले. मानखुर्द मधील महाराष्ट्र नगर इथेही या संस्थेने गरजू आणि तृतीयपंथी यांना मदत केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com